शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थान सरकारकडून CAA विरोधात ठराव मंजूर; आतापर्यंत तीन राज्यं कायद्याविरोधात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 17:40 IST

केरळ, पंजाबपाठोपाठ राजस्थान सरकारकडूनही CAA विरोधात ठराव मंजूर

नवी दिल्ली: सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) राजस्थान सरकारनं ठराव मंजूर केला आहे. मोदी सरकारनं सीएए मागे घेण्याची मागणी राजस्थान सरकारनं केली आहे. सीएए विरोधात विधानसभेत ठराव मंजूर करणारं राजस्थान देशातलं तिसरं राज्य ठरलं आहे. याआधी केरळ आणि पंजाबमध्ये सीएए विरोधात ठराव पारित झाला आहे. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीमध्ये केलेले बदल रद्द करण्याची मागणीदेखील राजस्थान सरकारनं केली आहे. सीएए विरोधातला ठराव आज राजस्थानच्या विधानसभेत मांडण्यात आला. 'सीएएमधील तरतुदींमुळे संविधानाचं उल्लंघन होत आहे. सीएए धर्माच्या नावाखाली नागरिकांशी भेदभाव करतो. त्यामुळे हा कायदा मागे घेण्यात यावा, अशी मागणी विधानसभा करते. देशात कायद्यासमोर सर्व धर्मीय समान असायला हवेत,' असं ठरावात नमूद करण्यात आलं होतं. सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीविरोधात देशात संतापाचं वातावरण आहे. यामुळे सर्वसामान्यांना अडचणींचा सामना करावा लागेल, असं राजस्थान विधानसभेत मांडण्यात आलेला ठराव सांगतो. 'राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीतून गोळा करण्यात आलेला मजकूर राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीसाठी वापरण्यात येणार आहे. याविरोधात देशात कित्येक ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. याशिवाय नागरिकत्व कायद्याविरोधात करण्यात आलेल्या सुधारणा धर्माच्या आधारावर लोकांमध्ये भेदभाव करणाऱ्या आहेत. विशिष्ट समुदायाच्या व्यक्तींना नागरिकत्वापासून वंचित ठेवण्यासाठीच या सुधारणा करण्यात आल्या आहेत,' अशा शब्दांमध्ये सीएए, एनआरसी आणि एनपीआरबद्दल ठरावात आक्षेप नोंदवण्यात आले आहेत.  

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक