शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

सॅल्यूट! मजूर आईला न्याय मिळवून देण्यासाठी शेतकऱ्याचा लेक झाला IAS; 'त्या' घटनेने बदललं आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 12:14 IST

Hemant Pareek : आई मनरेगामध्ये रोजंदारीवर काम करायची आणि वडील शेतकरी होते, त्यामुळे घर चालवणं अवघड होतं.

कठोर परिश्रम केले की यश आपसुकच मिळतं. राजस्थानमधील एका शेतकऱ्याच्या मुलाने हे सिद्ध करून दाखवलं आहे. त्याची आई मनरेगामध्ये रोजंदारीवर काम करायची आणि वडील शेतकरी होते, त्यामुळे घर चालवणं अवघड होतं. हेमंत पारीक असं या मुलातं नाव असून त्याच्या आईला मजुरी म्हणून २०० रुपये मिळायचे, पण तिला कधी ६० रुपये तर कधी ८० रुपये मिळायचे. 

एके दिवशी आईने तिच्या मुलाला तिची वेदना सांगितली. त्यानंतर हेमंतने त्या लोकांना याचा जाब विचारला तेव्हा तुम्ही कलेक्टर आहात का? असं विचारून हेमंतला तिथून हाकलून देण्यात आलं. त्या दिवसाआधी हेमंतने कलेक्टर हा शब्दही ऐकला नव्हता. पदवीनंतर नोकरी करून घराची जबाबदारी घेण्याचा हेमंतचा हेतू होता, पण आईला न्याय मिळवून देण्यासाठी त्याने कलेक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते त्याने पूर्ण केलं.

हेमंतचा जन्म राजस्थानमधील हनुमानगड येथील एका गरीब कुटुंबात झाला. त्याने महर्षी दयानंद शाळेतून हिंदी माध्यमात दहावीपर्यंत शिक्षण घेतलं. त्यानंतर बारावी केली. हेमंतने जेईटी परीक्षा दिली आणि त्यात तो नापास झाला. पुढच्या वर्षी पुन्हा जेईटीची परीक्षा दिली आणि उत्तीर्ण झाला. पण सुरुवातीचे शुल्क भरण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते.

आयसीएआर परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, त्याला जयपूरमधील जोबनेर येथील नरेंद्र कृषी विद्यापीठात प्रवेश मिळाला. काही यूट्यूब चॅनेल्सच्या लिंक्स पाहून हेमंतला कळलं की आयएएसमधून कलेक्टर बनता येतं, मग त्याच दिवशी त्यांनी ठरवलं की एक दिवस कलेक्टर होणार.

पण सर्वात मोठी समस्या म्हणजे आयएएसची तयारी करण्यासाठी पैसे नव्हते, वडील म्हणाले की, तू दिल्लीला जा आणि मनापासून अभ्यास कर, आपण घर विकू. त्या दिवसापासून हेमंतने  UPSC-IAS ची तयारी सुरू केली, त्यानंतर परीक्षा उत्तीर्ण झाले आणि नाव यादीत आलं. सततच्या कठोर परिश्रमानंतर, त्याने २०२३ च्या यूपीएससीमध्ये दुसऱ्या प्रयत्नात ऑल इंडिया ८८४ रँक मिळवला.

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी