शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

"हे योग्य नाही..."; स्वतःऐवजी पतीला तिकीट मिळाल्याने काँग्रेस आमदार प्रचंड संतापल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2023 13:13 IST

राजस्थानमधील अलवरच्या रामगड मतदारसंघातून एक महिला आमदाराने पतीला तिकीट दिल्याने नाराज झाल्याची घटना समोर आली आहे.

निवडणुकीच्या काळात राजस्थानमधील अलवरच्या रामगड मतदारसंघातून एक महिला आमदार पतीला तिकीट दिल्याने नाराज झाल्याची घटना समोर आली आहे. तिकीट रद्द केल्याने संतापलेल्या या महिला आमदाराने तिकीट रद्द करून पक्षाने योग्य काम केले नाही, असंही म्हटलं आहे. साफिया खान या रामगड विधानसभेच्या आमदार आहेत. यावेळी त्यांच्या जागी काँग्रेसने त्यांचे पती जुबेर खान यांना उमेदवारी दिली आहे. अशा स्थितीत साफिया खान यांची नाराजी स्पष्टपणे दिसून येत आहे.

या प्रकरणावर जुबेर यांची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. जुबेर हे प्रियंका गांधी यांच्या जवळचे असल्याचं सांगितलं जातं. काँग्रेसच्या कार्यक्रमानिमित्त जुबेर सध्या दिल्लीत आहेत. या जागेवर भाजपाने यापूर्वी ज्ञानदेव आहुजा यांना बराच काळ उमेदवारी दिली होती, जे नेहमी जिंकत होते, परंतु 2018 च्या विधानसभा निवडणुकीत ज्ञानदेव आहुजा यांचे तिकीट कापून सुखवंत सिंह यांना उमेदवारी देण्यात आली होती. अशा स्थितीत काँग्रेसचा विजय झाला आणि साफिया खान मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. आता रामगडमध्ये भाजपा कोणाला तिकीट देते हे पाहावे लागेल.

विधानसभा निवडणुकीत भाजप असो वा काँग्रेस, सर्वांनाच विरोध होत आहे. भाजपाची दुसरी यादी बाहेर आल्यानंतर अलवर शहर आणि थानगजी विधानसभा मतदारसंघातून निषेधाचे सूर उमटू लागले आहेत. राजस्थानमध्ये भाजपने आतापर्यंत 124 जागांवर आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. अलवरच्या थानागाजी विधानसभा मतदारसंघातून भाजपाने हेमसिंह भदाना यांना उमेदवारी दिली आहे. या घोषणेनंतर भाजपा कार्यकर्त्यांनी निदर्शने करत त्यांच्याच उमेदवाराच्या पुतळ्याचे दहन केले

हेमसिंह भदाना यांनी 2018 मध्ये थानगाजी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. या जागेवर महंत प्रकाश दास आणि रोहितेश घंगाल दावा करत होते. अशा स्थितीत पक्षाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे भाजपाने अलवर शहर विधानसभा मतदारसंघातून संजय शर्मा यांना तिकीट दिलं आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसElectionनिवडणूकPoliticsराजकारण