शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थान मंत्रिमंडळात १२ नवे चेहरे, माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या ५ समर्थकांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 06:36 IST

राज्यात २०२३ साली विधानसभा निवडणुका आहेत. पंजाबप्रमाणे इथेही  काँग्रेसमधील मतभेद चिघळू नये याची दक्षता पक्षश्रेष्ठींनी या विस्तारावेळी घेतली. १५ मंत्र्यांपैकी ममता भूपेश बैरवा, भजनलाल जटाव, टिकाराम जुली यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती दिली आहे. 

जयपूर : राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत व माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील तीव्र मतभेदांच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेला  मंत्रिमंडळ विस्तार अखेर रविवारी झाला. मंत्रिमंडळात १५ मंत्र्यांचा समावेश केला आहे. त्यात ११ कॅबिनेट दर्जाचे व ४ राज्यमंत्री आहेत. पायलट यांच्या पाच समर्थकांनाही नव्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.राज्यात २०२३ साली विधानसभा निवडणुका आहेत. पंजाबप्रमाणे इथेही  काँग्रेसमधील मतभेद चिघळू नये याची दक्षता पक्षश्रेष्ठींनी या विस्तारावेळी घेतली. १५ मंत्र्यांपैकी ममता भूपेश बैरवा, भजनलाल जटाव, टिकाराम जुली यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती दिली आहे. गेल्या वर्षी सचिन पायलट समर्थकांनी बंड केल्यानंतर विश्वेंद्रसिंह व रमेश मीना या त्यांच्या समर्थकांना मंत्रिमंडळातून काढले होते. या दोघांची नव्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे.  इतर कॅबिनेट मंत्र्यांमध्ये हेमाराम चौधरी, महेंद्रजितसिंह मालवीय, रामलाल जाट, महेश जोशी, गोविंदराम मेघवाल, शकुंतला रावत यांचा समावेश आहे.जाहिदा खान, ब्रिजेंद्रसिंह ओला, राजेंद्र गुढा, मुरारीलाल मीना हे राज्यमंत्री आहेत. शकुंतला रावत, जाहिदा या महिला मंत्र्यांसह १२ नवे चेहरे आहेत. पाच जण पायलट समर्थक आहेत. चार दलित मंत्र्यांचा  पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे. नव्या १५ मंत्र्यांना त्यांच्या पदाची शपथ राज्यपाल कलराज मिश्र यांनी दिली. 

‘मंत्रिमंडळ विस्तारामुळे सकारात्मक संदेश’राजस्थान मंत्रिमंडळाच्या विस्तारामुळे या राज्यात सकारात्मक संदेश गेला आहे. आता मंत्रिमंडळात दलित, आदिवासी व महिला मंत्र्यांची संख्याही वाढली आहे, असे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानAshok Gahlotअशोक गहलोत