शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

मतदान जास्त हाेवाे की कमी, सत्ता परिवर्तन झालेच! तीन दशकांत ६ निवडणुकांमध्ये राहिली परंपरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 10:13 IST

Rajasthan Assembly Election: गेल्या ३० वर्षांपासून राजस्थानमध्ये प्रत्येक निवडणुकीनंतर सत्ता परिवर्तन हाेत आले आहे. या काळात सहा निवडणुका झाल्या. त्यापैकी चार वेळा मतदानाचे प्रमाण वाढले, तर दाेन वेळा घटले. मात्र, त्या परिस्थितिदेखील सत्ता परिवर्तन झाले आहे.

जयपूर : गेल्या ३० वर्षांपासून राजस्थानमध्ये प्रत्येक निवडणुकीनंतर सत्ता परिवर्तन हाेत आले आहे. या काळात सहा निवडणुका झाल्या. त्यापैकी चार वेळा मतदानाचे प्रमाण वाढले, तर दाेन वेळा घटले. मात्र, त्या परिस्थितिदेखील सत्ता परिवर्तन झाले आहे. भाजपने १९९३मध्ये जनता दलाच्या साथीने सरकार स्थापन केले हाेते. तर काॅंग्रेसने २००८मध्ये बसपच्या विधायकांना पक्षात ओढून सरकार स्थापन केले हाेते.

- राजस्थानमध्ये यावेळी ७३ टक्के मतदान झाले आहे. गेल्या निवडणुकीच तुलनेत हा आकडा कमी दिसत आहे. - मतदान रात्री उशीरपर्यंत सुरू असल्यामुळे मतदानाचा टक्का वाढू शकताे. - पुन्हा सत्ता परिवर्तन हाेणार की काॅंग्रेसचेच सरकार पुन्हा येणार, हे ३ डिसेंबरलाच कळणार आहे. 

गेल्या ३० वर्षांमध्ये असा राहिला सत्तेचा कल१९९३ : यावर्षी भाजपला बहुमत मिळविता आले नाही. मात्र, भाजपने जनता दलाला साेबत घेऊन सरकार स्थापन केले.१९९८ : काॅंग्रेसने अशाेक गेहलाेत यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणूक लढविली. काॅंग्रेसला १५३ तर भाजपला ३३ जागा मिळाल्या. २००३ : भाजपने या निवडणुकीत १२० जागा जिंकल्या. तर काॅंग्रेसला ५६ जागा मिळाल्या. गेहलाेत यांचा पराभव करुन वसुंधरा राजे मुख्यमंत्री झाल्या.२००८ : मतदानात किरकाेळ घट झाली. काॅंग्रेसने बसपच्या ६ आमदारांना साेबत घेऊन सरकार स्थापन केले. गेहलाेत मुख्यमंत्री झाले.२०१३ : १६३ जागा जिंकून प्रचंड बहुमतासह वसुंधरा राजे यांनी सरकार स्थापन केले. काॅंग्रेसला केवळ २१ जागा मिळाल्या.२०१८ : भाजप आणि काॅंग्रेसमध्ये माेठी चुरस यावेळी दिसली. मात्र, पुन्हा सत्ता परिवर्तन झाले. १०० जागा जिंकून काॅंग्रेसने सरकार स्थापन केले.

टॅग्स :congressकाँग्रेसRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूक