शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानात शिवसेनेला 'अच्छे दिन'; भाजपाच्या नेत्याचा पक्षाला रामराम, उचलला 'धनुष्य-बाण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 16:26 IST

भाजपा नेता शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढणार

जयपूर: निवडणुकीआधी उमेदवारांकडून होणारं पक्षांतर काही नवं नाही. आपल्याला तिकीट मिळणार नाही, अशी शक्यता दिसताच नेते मंडळी नवा मार्ग शोधू लागतात. राजस्थानातही असंच घडलं आहे. भाजपाच्या नेत्यानं विधानसभा निवडणुकीआधी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. विशेष म्हणजे हा नेता शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवणार आहे. राजस्थानात 7 डिसेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. अलवर जिल्ह्यातील भाजपाचे नेते श्रीकृष्ण गुप्ता यांनी काल उमेदवारी अर्ज भरला. अलवर (शहर) विधानसभा मतदारसंघातून आपल्याला भाजपाकडून उमेदवारी मिळेल, अशी आशा गुप्ता यांना होती. मात्र गेल्या आठवड्यात भाजपाकडून जाहीर झालेल्या उमेदवारांच्या यादीत त्यांचं नाव नव्हतं. भाजपानं या मतदारसंघातून संजय शर्मा यांना तिकीट दिलं. सध्या बनवारीलाल या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. तेदेखील भाजपाचे नेते आहेत. मात्र पक्षानं त्यांचाही पत्ता कापला. नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवून सरकारविरोधातील नाराजी टाळण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. तिकीट वाटप करताना भाजपानं वैश्य समाजाकडे दुर्लक्ष केल्याची भावना गुप्ता यांनी पक्ष सोडताना बोलून दाखवली. 'ब्राह्मण समाजाचे मतदार कमी असतानाही त्यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र वैश्य समाजाचे मतदार जास्त असतानाही त्यांना तिकीट वाटपात जाणीवपूर्वक डावलण्यात आलं,' असा आरोप गुप्ता यांनी केला. तिकीट वाटप करताना पक्षानं स्वत:चा आणि एजन्सीचा सर्व्हेदेखील विचारात घेतला नाही. त्यामुळे आपण पक्षाला रामराम करत असल्याचं गुप्ता यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं. 

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकBJPभाजपाShiv Senaशिवसेना