शहरं
Join us  
Trending Stories
1
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
2
Video: चीन आता लांडग्याला युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
3
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
4
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
5
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
6
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
7
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?
8
नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का
9
इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?
10
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
11
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
12
"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"
13
शाळेजवळ डान्सबार, बघे पोलिस, कारवाई मनसेवर
14
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
15
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
16
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
17
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश
18
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
19
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
20
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा

मोदींची जात कोणती?; काँग्रेस नेत्याची जीभ घसरली, राहुल गांधींनी 'शाळा' घेतली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 12:47 IST

'धर्माबद्दल बोलण्याचा अधिकार केवळ ब्राह्मणांनाच आहे. तुम्हाला पंतप्रधान मोदी आणि उमा भारतींची जात माहीत आहे का? साध्वी ऋतंभरा कोणत्या जातीच्या आहेत? हे लोक धर्माबद्दल काय जाणतात?'

नवी दिल्लीः राजस्थान विधानसभा निवडणुकीची तारीख जवळ आली असताना, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सी पी जोशी यांच्या एका विधानानं पक्षाची डोकेदुखी वाढवली आहे. माजी केंद्रीय मंत्री सी पी जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उमा भारती यांच्या जातीचा उल्लेख करून भाजपाच्या हाती आयतंच कोलीत दिलंय. जोशींचं हे विधान महागात पडू शकतं, हे ओळखून थेट काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीच त्यांना दिलगिरी व्यक्त करण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर लगेचच जोशींचा माफीनामा आला. 'धर्माबद्दल बोलण्याचा अधिकार केवळ ब्राह्मणांनाच आहे. तुम्हाला पंतप्रधान मोदी आणि उमा भारतींची जात माहीत आहे का? साध्वी ऋतंभरा कोणत्या जातीच्या आहेत? हे लोक धर्माबद्दल काय जाणतात?', असं वादग्रस्त विधान सी पी जोशी यांनी गुरुवारी राजस्थानातील एका सभेत केलं होतं. त्यानंतर, भाजपाने हा मुद्दा उचलून धरला आणि काँग्रेसवर निशाणा साधला.

Shocking statement by Congress leader CP Joshi ..says “ये उमा भरती किस जाति की हैं?ये मोदी किस जात का हैं? ..केवल ब्राह्मण ही हिंदू धर्म की बात कर सकता हैं..।He even goes ahead to say that they belong to “lowly castes” who should not be speaking about HinduismAppalling!!— Sambit Patra (@sambitswaraj) November 22, 2018

भाजपा आपल्या वक्तव्याचा विपर्यास करत असल्याची सारवासारव सी पी जोशी यांनी केली. त्या भाषणाच्या व्हिडीओची लिंकही शेअर केली. परंतु, ७ डिसेंबरला मतदान असल्यानं, ताकही फुंकून पिण्याचा पवित्रा घेत, या विषयाची दखल थेट राहुल गांधींनीच घेतली. सी पी जोशी यांचं विधान काँग्रेस पक्षाच्या विचारांना, परंपरेला शोभणारं नाही. समाजातील कुठलाही वर्ग दुखावला जाईल, अशी वक्तव्यं नेत्यांनी करू नयेत. सी पी जोशी यांनीही या वक्तव्याबद्दल दिलगीरी व्यक्त करावी, असं ट्विटच राहुल यांनी केलं. पक्षश्रेष्ठींच्या या आदेशानंतर लगेचच सी पी जोशी यांनी आपल्या विधानाबद्दल खेद व्यक्त केला.

सी पी जोशी जी का बयान कांग्रेस पार्टी के आदर्शों के विपरीत है। पार्टी के नेता ऐसा कोई बयान न दें जिससे समाज के किसी भी वर्ग को दुःख पहुँचे।कांग्रेस के सिद्धांतों, कार्यकर्ताओं की भावना का आदर करते हुए जोशीजी को जरूर गलती का अहसास होगा। उन्हें अपने बयान पर खेद प्रकट करना चाहिए।— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 23, 2018

कांग्रेस के सिद्धांतो एवं कार्यकर्ताओं की भावनाओं का सम्मान करते हुए मेरे कथन से समाज के किसी वर्ग को ठेस पहुँची हो तो मैं उसके लिए खेद प्रकट करता हूँ ।— Dr. C.P. Joshi (@drcpjoshi) November 23, 2018

काँग्रेसच उभारेल राम मंदिर निवडणुका जवळ आल्यानं राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करून भाजपा जनतेला फसवण्याचा प्रयत्न करतेय. हा विषय अजून सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यांचा निकाल आला की काँग्रेसच अयोध्येत राम मंदिर उभारेल, अशी घोषणा सी पी जोशी यांनी सभेत केली होती.

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी