शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानमधल्या 28 आमदारांना जीवे मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 13:10 IST

राजस्थानमध्ये निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्यातच आता राजस्थानातील 28 आमदारांना जीवे मारण्याची धमकी आल्यानं वातावरण तणावग्रस्त झालं आहे.

जयपूर- राजस्थानमध्ये निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्यातच आता राजस्थानातील 28 आमदारांना जीवे मारण्याची धमकी आल्यानं वातावरण तणावग्रस्त झालं आहे. पोलिसांनी धमकी देणा-या आरोपीला अटक केली असून, तपास सुरू आहे. राजस्थानातील 28 आमदारांना धमकीचे मेसेज पाठवणारा आरोपी मुहम्मद हुसैन याला माणकचौक पोलिसांनी अटक केली आहे. शानदार चित्रपटासारखं हे प्रकरण आहे.आरोपीनं मेसेजमध्ये लिहिलं की, खंडणीची रक्कम अजमेर दर्गा बाजारातल्या रुबी नामक मुलीकडे पोहोचवायची आहे. जसे मला पैसे मिळतील, तसे मी आमदारांना मारण्याची सुपारी कोणी दिली होती, त्या व्यक्तीनं नाव सांगेन. तुम्ही जर मला खंडणीची रक्कम दिली नाही, तर तुम्ही दिवाळी आणि येत्या निवडणुका पाहू शकणार नाही. आरोपीच्या या मेसेजमुळे आमदारांमध्येही काहीशी भीती होती. ही घटना अशा वेळी उजेडात आली, जेव्हा पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या बाडमेर जिल्ह्यात एका आमदाराला व्हॉट्सअॅपवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. आमदारानं खंडणीचे 60 लाख न दिल्यानं त्याला ठार करण्यात आलं.मेसेज मिळाल्यानंतर त्या आमदारांनी बाडमेरच्या पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. एकाच वेळी 28 आमदारांना जीवे मारण्याची धमकी आल्यानं पोलीस यंत्रणाही खडबडून जागी झाली. त्यानंतर रात्रभर आरोपीवर पाळत ठेवून पोलिसांनी त्याला अटक केली. धमकी देणारा तरुण हा महाराष्ट्रातल्या नाशिकचा रहिवासी आहे. अजमेर दर्गा बाजारात तो एक हॉटेलमध्ये वेटरचं काम करत होता. पोलिसांनी त्याचा मोबाईल तपासला असता 28 आमदारांचे नंबर आणि तो मेसेज पाठवल्याचं उघड झालं. पोलीस आरोपीची कसून तपासणी करत आहेत. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूक