शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

असहिष्णुतेचा कळस! जखमींना मदत करण्याऐवजी लोक सेल्फीत मग्न, हकनाक गेला तिघांचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 16:06 IST

गेल्या काही दिवसांपासून लोकांमधली संवेदनहीनता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

जयपूर- गेल्या काही दिवसांपासून लोकांमधली संवेदनहीनता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ब-याचदा अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करायची सोडून लोक त्यांचे फोटो आणि व्हिडीओ काढत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. राजस्थानतल्या बाडमेर जिल्ह्यातही असाच एक किळसवाणा प्रकार उजेडात आला आहे. बाडमेर जिल्ह्यात रस्त्यावर एका स्कूल बसनं बाइकस्वारांना उडवलं.त्या अपघातग्रस्त बाइकस्वारांना मदत करायची सोडून काही विघ्नसंतोषी माणसं त्यांच्याबरोबर सेल्फी घेण्यात दंग झाली. वेळीच त्या जखमींवर उपचार न झाल्यानं तिघांनाही जिवाला मुकावं लागलं आहे. मंगळवारी बाडमेर जिल्ह्यात रस्त्यावर बाइक आणि स्कूलबसचा अपघात झाला. या अपघातात बाइकवरील तिघे गंभीररीत्या जखमी झाले.त्याच वेळी जखमींना मदत करायची सोडून लोकांनी सेल्फी आणि व्हिडीओ घेण्यात धन्यता मानली. कोणालाही त्यांना मदत करावीशी वाटली नाही. अपघातग्रस्त तरुण हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. तरीही त्यांना मदत करण्याऐवजी लोक त्यांच्याबरोबर सेल्फी घेण्यात व्यस्त होते. तिन्ही जखमींना वेळीच उपचार न मिळाल्यानं त्यांचा हकनाक जीव गेला. अपघातग्रस्त व्यक्ती मदतीसाठी बघ्यांकडे याचना करत होते. परंतु तरीही त्यांच्या हृदयाला काही पाझर फुटला नाही. त्यांनी शेवटपर्यंत त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यात धन्यता मानली. 

परमानंद, चंदा राम आणि गेमा राम यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. ते सर्व गुजरातमध्ये कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करत होते. दोन दिवसांपूर्वीच मजुरांच्या शोधात ते बाडमेरमध्ये आले होते. विशेष म्हणजे यापूर्वीसुद्धा देशात अशा ब-याचशा घटना घडल्या आहेत. जेथे जखमींना मदत करायची सोडून लोक त्यांच्याबरोबर सेल्फी घेण्यात धन्यता मानली आहे.