शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदी निर्णयाची वर्षपूर्ती- राजस्थानमध्ये 50 हजार लोक गाणार वंदे मातरम्

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2017 09:43 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला 8 नोव्हेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला 8 नोव्हेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे.नोटाबंदी निर्णयाची वर्षपूर्ती साजरी करण्यासाठी राजस्थानच्या वसुंधरा राजे सरकारने खास तयारी केली आहे.

जयपूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला 8 नोव्हेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. नोटाबंदी निर्णयाची वर्षपूर्ती साजरी करण्यासाठी राजस्थानच्या वसुंधरा राजे सरकारने खास तयारी केली आहे. राजस्थानमध्ये नोटाबंदीचं एक वर्ष साजरं केलं जाणार आहे. जयपूरच्या सवाई माधोसिंह स्टेडिअममध्ये यानिमित्त एक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात ५० हजार लोक एकत्रित वंदे मातरम् आणि राष्ट्रगीत गाणार आहेत.

विरोधी पक्षांनी वसुंधरा राजे सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. 'सरकार आपली नामुष्की झाकायला अति राष्ट्रवादाला उत्तेजन देत आहे,' असा आरोप विरोधकांनी केला आहे. वसुंधरा राजे यांच्या या निर्णयाच्या तीनच दिवस आधी जयपूर पालिकेतल्या सर्व कर्मचाऱ्यांनी सकाळी काम सुरू करण्यापूर्वी आणि निघताना राष्ट्रगीत आणि वंदे मातरम् गाण्याची सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला.

नोटाबंदी वर्षपूर्तीच्या या कार्यक्रमाचे आयोजन युवा आणि क्रीडा विभागांतर्गत असलेलं राजस्थान युथ बोर्ड करत आहे. अशा प्रकारचे कार्यक्रम तरूणांमध्ये नैतिक मूल्यं रुजवतात, असं राजस्थान युथ बोर्डाचे उपाध्यक्ष संदीप यादव यांनी म्हंटलं. आरएसएसचे समर्थन असणारी हिंदू आध्यात्मिक आणि सेवा संघटनासुद्धा या कार्यक्रमाला सहकार्य करत आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या असणार आहेत. संगीतकार कल्याणजी यांचा एक हिंदी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रमही यावेळी सादर होणार आहे. या दोन तासांच्या कार्यक्रमात एक योग सेशनही होणार आहे. परिवार, पर्यावरण व राष्ट्रासाठी प्रेम निर्माण करणं, हा या कार्यक्रमामागील हेतू आहे. 

काँग्रेस साजरा करणार काळा दिवस 8 नोव्हेंबर रोजी भाजपा सरकारकडून नोटाबंदीच्या निर्णयाची वर्षपूर्ती साजरी करण्यासाठी कार्यक्रम आखले जात आहेत. तर दुसरीकडे विरोधी पक्ष हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करण्याच्या तयारीत आहे.  

टॅग्स :Note Banनोटाबंदी