शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

Ajmer: या शहरात लागू झाली भोंग्यांवर बंदी; दिले वेगळेच कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 15:01 IST

मशीदींवरील भोंग्यांवरून महाराष्ट्रातील राजकारण तापलेले असताना काँग्रेसशासित राजस्थानमधून महत्वाची बातमी आली आहे.

मशीदींवरील भोंग्यांवरून महाराष्ट्रातील राजकारण तापलेले असताना काँग्रेसशासित राजस्थानमधून महत्वाची बातमी आली आहे. अजमेरच्या प्रशासनाने सर्व सार्वजनिक आणि धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरच्या वापरावर बंदी आणली आहे. हा आदेश ७ एप्रिलपासून लागू झाला आहे. 

अजमेर प्रशासनाने याला ध्वनीप्रदुषणाचे कारण दिले आहे. याचबरोबर सर्व धार्मिक झेंड्यांवर देखील बंदी घातली आहे. या निर्णयामागे अजान वादाची पार्श्वभूमी असल्याचेही सांगितले जात आहे. आदेशानुसार कोणताही व्यक्ती किंवा समुह किंवा लोक प्रतिनिधी कोणत्याही प्रकारच्या धार्मिक किंवा अन्य समारंभामध्ये डीजेचा वापर परवानगीशिवाय करणार नाही. जर ध्वनीक्षेपकाचा वापर करायचा असेल तर त्यासाठी एसडीएमकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. याचबरोबर रात्री १० ते  सकाळी ६ वाजेपर्यंत ही परवानगी दिली जाणार नाही. 

परवानगी मिळल्यानंतर ध्वनी प्रदूषणाचा स्तर कायद्यानुसार निर्धारित स्तरापेक्षा जास्त असता नये, अशा अटी घालण्यात आल्या आहेत. याचबरोबर अजमेरमध्ये धार्मिक झेंडे आणि अन्य धार्मिक प्रतिकांवरही बंदी घालण्यात आली आहे. अजमेरमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. एसपींकडून हे आदेश जारी करण्यात आले आहेत. याद्वारे खासगी संपत्तीवरही धार्मिक झेंडा लावता येणार नाहीय. 

ही बंदी एका महिन्यासाठी लागू करण्यात आली आहे. 

टॅग्स :Rajasthanराजस्थान