शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सात जन्मांची साथ..., हत्या केल्यानंतर सोनमने राजाच्या अकाउंवरून शेअर केली अशी पोस्ट, पण ती एक चूक नडली, पोलिसांना आला संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 17:18 IST

Raja Raghuvanshi Murder Case: राजा रघुवंशी हत्या प्रकरण सध्या देशभरात गाजत आहे. या हत्या प्रकरणी राजा रघुवंशी याची पत्नी सोनम हीच मुख्य आरोपी असल्याची माहिती समोर आल्याने अनेकांना धक्का बसला होता. मेघालय पोलिसांनी ऑपरेशन हनिमून अंतर्गत तपास करून नियोजनबद्धरीत्या करण्यात आलेल्या या हत्याकांडाचा एकेक घटनाक्रम समोर आणला आहे.

राजा रघुवंशी हत्या प्रकरण सध्या देशभरात गाजत आहे. या हत्या प्रकरणी राजा रघुवंशी याची पत्नी सोनम हीच मुख्य आरोपी असल्याची माहिती समोर आल्याने अनेकांना धक्का बसला होता. मेघालय पोलिसांनी ऑपरेशन हनिमून अंतर्गत तपास करून नियोजनबद्धरीत्या करण्यात आलेल्या या हत्याकांडाचा एकेक घटनाक्रम समोर आणला आहे. तसेच या हत्येप्रकरणी सोनम आणि अन्य तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, हनिमूनसाठी मेघालयमध्ये गेल्यानंतर सोनमने कुठलाही फोटो अपलोड न करणे आणि राज्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट करणे या प्रकरणात पोलिसांसाठी महत्त्वाचा दुवा ठरले.

राजा रघुवंशी आणि सोनम हे नवविवाहित जोडपं हनिमूनसाठी शिलाँग येथे गेलं होतं. मात्र सोनमने या काळात एकही फोटो सोशल मीडियावर शेअर केला नव्हता, सर्वसाधारणपणे नवविवाहित जोडपी सोशल मीडियावर बरेच फोटो शेअर करत असतात. त्यामुळे ही बाब पोलिसांना खटकली. तसेच त्यांना सोनवमर संशय आला. मात्र राजाची हत्या केल्यानंतर त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सोनमने दुपारी २.१५ च्या सुमारास एक पोस्ट केली. त्यात तिने साथ जन्मांची साथ आहे..., असं लिहिलं होतं. खरंतर ही पोस्ट पोलिसांचं तपासापासूनचं लक्ष विचलित करण्यसाठी करण्यात आली होती.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळापासून १० किमी अंतरावर सोनम हिला तीन आरोपी आकाश विशाल आणि आनंदसोबत बोलताना सीसीटीव्ही पाहिले. तसेच घटनास्थळावरून आकाशचं रक्ताने माखलेलं जॅकेट, सोनमचा रेनकोट आणि आणि राजाच्या मोबाईलचे अवशेष सापडले होते. तपासामध्ये सोनम हिने आपलं जॅकेट राजाला दिलं होतं, असं उघड झालं आहे. त्यावरही रक्ताचे डाग पडले होते. तेही घटनास्थळावर फेकण्यात आलं होतं.

या प्रकरणातील एक आरोपी आनंद याला जेव्हा पोलिसांनी अटक केली तेव्हा त्याने राजाची हत्या करताना घातलेले कपडेच परिधान केलेले होते. तर राजावर पहिला वार विशालने केला होता. तसेच त्यासाठी त्यांनी गुवाहाटी रेल्वे स्टेशनजवळून हत्यार खरेदी केलं होतं.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशmarriageलग्न