शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंनी माफी मागावी, हिंदू धर्माचार्यांचे आदेश; ५ लाख लोक अयोध्येत येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 12:57 IST

राज ठाकरेंना माफी मागण्याची एक संधी आहे. माफी मागितली नाही तर झारखंड, उत्तर प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, बिहार याठिकाणी आयुष्यात कधीही येऊ शकणार नाही असं बृजभूषण सिंह यांनी सांगितले.

नंदिनीनगर – मनसे प्रमुख राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी उत्तर प्रदेशची माफी मागावी अन्यथा अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही अशी भूमिका घेत भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी यूपीत मोठं शक्तीप्रदर्शन केले आहे. राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी साधू महंत यांची बैठक होत आहे. या बैठकीत हिंदू धर्माचार्य या नात्यानं राज ठाकरेंना माफी मागण्याचे आदेश देण्यात आले आहे. राज ठाकरेंनी माफी मागितल्यास इतक्याच संख्येने त्यांचे स्वागत करू असंही साधू महंतांनी म्हटलं आहे.

यावेळी खासदार बृजभूषण सिंह म्हणाले की, उत्तर भारतीयांचा अपमान राज ठाकरेंनी केला. राज ठाकरेंना माफी मागावीच लागेल. राज ठाकरेंना उत्तर भारतीयांसमोर नतमस्तक व्हावं लागेल. जोपर्यंत राज ठाकरे माफी मागत नाही  तोवर अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही. राज ठाकरेंच्या विरोधाला ५ लाख लोक असतील. राज ठाकरे विमानातून यावे अन्यथा रेल्वेतून यावं त्यांना उतरू देणार नाही. माफी मागितली तरच जनतेचा राग कमी होईल. आम्ही राजकारणासाठी हे करत नाही. हे जात, धर्माचं आदोलन नाही. माफी मागितली नाही तर राज ठाकरेंना महाराष्ट्रातच राहावं. आमची माफी मागितली नाही तरी चालेल संतांची माफी मागावी असं त्यांनी सांगितले.

तसेच राज ठाकरेंना माफी मागण्याची एक संधी आहे. माफी मागितली नाही तर झारखंड, उत्तर प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, बिहार याठिकाणी आयुष्यात कधीही येऊ शकणार नाही. तुम्ही केलेले पाप तुम्हालाच आठवेल. राज ठाकरेंना माफ करायचं आहे परंतु ते माफी मागायला तयार नाही. साधूंची माफी मागितल्यास अयोध्येत येऊ देणार. संताची माफी मागा तुम्ही देशाचे नेते व्हाल. महाराष्ट्र माझ्यासाठी आदरनीय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना मी आदर्श मानतो. संत समाजही छत्रपतींना आदर्श मानतो. माझा विरोध राज ठाकरे व्यक्तीला आहे. महाराष्ट्राला नाही असंही बृजभूषण सिंह यांनी सांगितले.

दरम्यान, राज ठाकरे कधी महाराष्ट्राच्या बाहेर आले नाहीत त्यामुळे हा विरोध करता आला नाही. आता समोर यावं २००८ मध्ये उत्तर भारतीयांना मारहाण करण्यात आली. तेव्हापासून आमचा हा राग आहे. माझं वैर महाराष्ट्राशी नाही. माफी मागितल्याशिवाय राज ठाकरेंना अयोध्येत येऊ देणार नाही. राज ठाकरेंना विरोध करण्यासाठी ५ लाख लोकांनी ५ जून रोजी अयोध्येत जमावं असं आवाहनही बृजभूषण सिंह यांनी केले आहे.    

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेAyodhyaअयोध्याBJPभाजपा