शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

Raj Thackeray Ayodhya Tour: राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित; आता खासदार बृजभूषण सिंह म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 12:41 IST

Raj Thackeray Ayodhya Tour: मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला आहे. या घोषणेनंतर राज यांना विरोध करणारे भाजप खासदार बृजभूषण सिंह यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

MNS Chief Raj Thackeray Ayodhya Tour: अयोध्या: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा 5 जून रोजी होणारा अयोध्या (Ayodhya) दौरा स्थगित करण्यात आला आहे. स्वतः राज ठाकरे यांनी ट्विटरवरुन याची घोषणा केली आहे. प्रकृती अस्वस्थामुळे दौरा काही काळासाठी स्थगित केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, राज ठाकरेंच्या या घोषणेनंतर उत्तर प्रदेशात त्यांना विरोध करणारे भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh)  यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली होती, त्या दुखण्याने पुन्हा डोकं वर काढल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी अयोध्या दौरा स्थगित केल्याचे सांगितले. याविषयी येत्या रविवारी पुण्यात होणाऱ्या सभेत ते सविस्तर माहिती देणार आहेत. दरम्यान, तिकडे उत्तर प्रदेशात राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध करणारे खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्याविरोधात शरयू स्नानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. 

शरयू स्नान होणारच'राज ठाकरे यांचा दौरा रद्द झाला असला तरी माझा शरयू स्नानाचा कार्यक्रम 5 जून रोजी होणारच आहे. आम्ही त्यादिवशी साधू-संतांच्या उपस्थितीत शरयू स्नान करू. आता राज ठाकरे अयोध्येत येणार नसल्याने आम्ही आणखी उत्साहात कार्यक्रम साजरा करू. आम्ही 5 जूनला आमचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा वाढदिवसही धुमधडाक्यात साजरा करू,' असे बृजभूषण सिंह यांनी सांगितले आहे.

'आम्ही मदत केली असती'- संजय राऊतांचा टोलाराज ठाकरेंचा दौरा रद्द झाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली. 'कुणाचा अयोध्या दौरा का रद्द झाला याबाबत आम्हाला काही माहित नाही. पण तुमचा वापर केला जातोय हे आतातरी लक्षात घ्या. राज ठाकरेंनी अयोध्या दौऱ्याबाबत आमची मदत मागितली असती तर नक्कीच आम्ही केली असती', असा टोला राऊतांनी लगावला. तसेच, आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा नियोजित वेळेनुसारच होणार असल्याचे त्यांनी म्हटले. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेAyodhyaअयोध्याBJPभाजपा