शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

बिटकॉइन घोटाळ्यात ईडीनं राज कुंद्रा यांना पाठवलं समन्स, चौकशी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2018 15:25 IST

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राला ईडी(अंमलबजावणी संचलनालया)नं बिटकॉइन प्रकरणात समन्स पाठवलं आहे.

नवी दिल्ली- अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राला ईडी(अंमलबजावणी संचलनालया)नं बिटकॉइन प्रकरणात समन्स पाठवलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राज कुंद्रांची मुंबईतच्या ईडीच्या कार्यालयात चौकशी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी या प्रकरणातला मुख्य आरोपी अमित भारद्वाजला पुण्यातून अटक करण्यात आली होती.अमित भारद्वाज याची चौकशी केली असता त्यानं राज कुंद्राचं नाव सांगितलं आहे. अनेक सेलिब्रिटी बिटकॉइनच्या माध्यमातून पैसे कमवत असल्याचंही ईडीच्या चौकशीत उघड झालं आहे. अमित भारद्वाज हा अनेक अभिनेत्यांचे पैसे बिटकॉइनमध्ये लावत होता. विशेष म्हणजे या घोटाळ्याची माहिती दोन हजार कोटी रुपयांपर्यंत असल्याची चर्चा आहे. अमितनं gatbitcoin.com नावाच्या वेबसाइटच्या माध्यमातून लोकांना गंडा घातला होता. यावेळी ईडीच्या रडारवर अनेक बॉलिवूडमधले अभिनेते आणि अभिनेत्री आहेत.अमित भारद्वार आणि त्याच्याशी संबंधित बिटकॉइन पाँजी स्कीमचं आमिष दाखवून जवळपास 50 ते 60 लोकांना गंडा घातला आहे. सर्व तक्रारीनंवर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं अमितविरोधात खटला भरला आहे. अमित भारद्वारविरोधात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलमध्ये बिटकॉइनशी संबंधित दोन प्रकरणे आहेत. पोलीस अमित भारद्वारकडे आणखी चौकशी करत आहेत. 

टॅग्स :Shilpa Shettyशिल्पा शेट्टी