S Jaishankar Invokes Cricket Analogy: भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी शुक्रवारी (3 मार्च) रायसीना डायलॉग 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताच्या अर्थव्यवस्थेवर भाष्य केले. यावेळी त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेची क्रिकेट खेळाशी तुलना केली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महान कर्णधार असल्याचे म्हटले.
भू-राजकीय आणि भू-आर्थिक समस्यांवर विचारमंथन आणि निराकरण करण्यासाठी रायसीना संवाद 2016 मध्ये सुरू करण्यात आला होता. परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनने याचे आयोजन केले आहे. जगातील अनेक देशांचे धोरणकर्ते, राजकारणी आणि पत्रकार, परराष्ट्र, संरक्षण आणि अर्थमंत्री यात सहभागी होतात. 2 मार्च ते 4 मार्चपर्यंत चालणाऱ्या या परिषदेचे पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केले होते. प्रमुख पाहुणे इटलीचे पंतप्रधान जॉर्जियो मिलोनी आहेत.
'पंतप्रधान मोदींची नेट प्रॅक्टिस सकाळी 6 वाजता सुरू होते'परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना रायसीना डायलॉग 2023 दरम्यान विचारण्यात आले होते की, अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पीओ यांनी नुकतेच त्यांच्या पुस्तकात तुमच्याविषयी लिहिले आहे. परराष्ट्र मंत्र्यांनी या प्रश्नाला अतिशय रोचक पद्धतीने उत्तर दिले. ते म्हणाले की, मला वाटते कॅप्टन मोदींनी खूप नेट प्रॅक्टिस केली आहे. त्यांचा सराव सकाळी सहा वाजता सुरू होतो आणि बराच वेळ चालतो, असे ते म्हणाले. याशिवाय, पीएम मोदी आपल्या विश्वासू लोकांना काम करण्याचे स्वातंत्र्य देतात, अशी माहितीही त्यांनी दिली.