रायपूर- छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपानं जाहीरनाम्याची घोषणा केली आहे. या जाहीरनाम्यात भाजपानं नवनव्या घोषणा केल्या आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राजधानी रायपूरमधल्या एका खासगी हॉटेलमधून हा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपानं जाहीरनाम्यात गाव, गरीब आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जोर दिला आहे. तसेच तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार असल्याचंही सांगितलं आहे.यावेळी भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याबरोबरच डॉ. रमण सिंह, कॅबिनेट मंत्री अमर अग्रवाल, भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री सारोज पांडेयसह भाजपाचे मोठे नेते उपस्थित होते. याच क्षणी शाह म्हणाले, डॉ. रमण सिंह यांच्या नेतृत्वात नव्या छत्तीसगडचे निर्माण करू. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेसलाही लक्ष्य केलं आहे. नक्षलवाद्यांना क्रांतीचं माध्यम समजणारा पक्ष छत्तीसगडचं काहीही भलं करणार नाही. भाजपा यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवून छत्तीसगडमध्ये चौथ्यांदा सत्तेत येईल. आजारी राज्य असलेला छत्तीसगड आता वीज आणि सिमेंट उत्पादनाचं केंद्र झाला आहे, असंही शाह म्हणाले आहेत. तसेच छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका केली आहे. काँग्रेस शेतक-यांना फक्त व्होट बँक समजते.
भाजपाकडून जाहीरनामा प्रसिद्ध, नवा छत्तीसगड बनवणार- अमित शाह
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 15:43 IST
छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपानं जाहीरनाम्याची घोषणा केली आहे.
भाजपाकडून जाहीरनामा प्रसिद्ध, नवा छत्तीसगड बनवणार- अमित शाह
ठळक मुद्देछत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून जाहीरनाम्याची घोषणा भाजपानं जाहीरनाम्यात गाव, गरीब आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जोर दिलाडॉ. रमण सिंह यांच्या नेतृत्वात नव्या छत्तीसगडचे निर्माण करू