शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

माओवादी समर्थकांविरोधात कारवाईचा धडाका, 500 जण CRPFच्या ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 09:24 IST

माओवादी समर्थकांविरोधात करण्यात आलेल्या कारवाईमध्ये सीआरपीएफला मोठे यश मिळाले आहे.

रायपूर - माओवादी समर्थकांविरोधात करण्यात आलेल्या कारवाईमध्ये सीआरपीएफला मोठे यश मिळाले आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये पहिल्यांदाच माओवाद्यांविरोधात संयुक्त कारवाई करण्यात आली आणि या कारवाई अंतर्गत गेल्या वर्षभरात एकट्या छत्तीसगडमध्ये माओवादी समर्थक असलेल्या 500 जणांना सीआरपीएफनं ताब्यात घेतले आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) महानिदेशक आर.आर.भटनागर यांनी कारवाईसंदर्भातील माहिती दिली आहे.  

एका मुलाखतीदरम्यान भटनागर यांनी सांगितले की, डाव्या विचारसरणीच्या समर्थकांचे जाळे खोलवर पसरू नये, या उद्देशाने राज्य पोलीस दलासोबत मिळून संयुक्त कारवाई करण्यात येत आहे. सीआरपीएफनं देशभरात वेगवेगळ्या राज्यांमध्ये माओवाद्यांविरोधात दोन हात करण्यासाठी दहा लाख सशस्त्र सैन्य तैनात केले आहे. 

भटनागर यांनी सांगितले की, आम्ही गावागावात जाऊन माओवादी समर्थकांविरोधात कारवाई करत आहोत. माओवादी समर्थक, कार्यकर्ते आणि त्यांना माहिती पुरवणारी स्थानिक जनता या सर्वांविरोधात कारवाई करण्यात येईल, या दिशेनं आम्ही मोहीम राबवण्याचा प्रयत्न करत आहोत. छत्तीसगडमध्ये गेल्या वर्षभरात आम्ही 500 हून अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे. शिवाय, माओवाद्यांना होणारा रसदपुरवठा कमी व्हावा, या दृष्टीकोनातून कारवाई करण्याचा प्रयत्न सुरू आहे.   

160 नक्षलवाद्यांचा खात्माछत्तीसगडमध्ये विशेष अभियान दलाचे नेतृत्व करणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितले की, ''सुरक्षा दलावर हल्ला करण्याचा कट रचणे, नक्षलवाद्यांना सहकार्य करणे आणि नक्षलवादी कारवायांमध्ये सहभागी होणे, या सर्व घटनांमध्ये नक्षलवाद्यांना मदत करणारी मंडळी सीआरपीएफच्या रडारवर होती. या लोकांची पाळेमुळे अधिक खोलवर रूजू नयेत यासाठी त्यांच्यावर नजर ठेऊन त्यांच्याविरोधात धडक  कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, 2018च्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत वेगवेगळ्या राज्यांमध्ये करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान 160 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.   

टॅग्स :naxaliteनक्षलवादी