शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

इंधन दरवाढीवरून विरोधक केंद्राला घेरणार; आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 05:06 IST

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून प्रारंभ होणार असून, सभागृहाचे कामकाज विनाअडथळा पार पडण्यासाठी विरोधी पक्षांनी सहकार्य करावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली :संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला उद्या, सोमवारपासून प्रारंभ होणार असून, सभागृहाचे कामकाज विनाअडथळा पार पडण्यासाठी विरोधी पक्षांनी सहकार्य करावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. आमची सर्व विषयांवर चर्चा करण्याची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र महागाई, इंधन दरवाढीचा फटका, राज्यांना लस मिळत नसणे, शेतकरी विरोधी कायदे आदी विषयांवर विरोधकांनी संसद अधिवेशनात आवाज उठविण्याचे ठरविले आहे. त्यामुळे संसदेचे कामकाज वादळी ठरणार आहे. या अधिवेशनाच्या आदल्या दिवशी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय नेत्यांची एक बैठक बोलाविली होती. त्यामध्ये केंद्रीय मंत्री राजनाथसिंह, केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी, अर्जूनराम मेघवाल आदी नेते उपस्थित होते.

चौधरी, मल्लिकार्जून खरगे, तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन, सुदीप बंडोपाध्याय, द्रमुकचे तिरुची शिवा, टी. आर. बालू, वायएसआर काँग्रेसचे मिथुन रेड्डी, विजयसाई रेड्डी, बसपचे रितेश पांडे, सतीश मिश्रा, समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव, शिवसेनेचे संजय राऊत, अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल आदी नेते उपस्थित होते. पंतप्रधानांनी बोलाविलेल्या या बैठकीला ३३ पक्षांचे ४० नेते हजर होते.

सभागृहांत कोणत्या विषयांवर चर्चा व्हायला हवी याबद्दल विविध पक्षांच्या नेत्यांनी सदर बैठकीत विचार मांडले. पाच अध्यादेशांसह सुमारे २९ विधेयके केंद्र सरकार संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मंजुरीसाठी मांडणार आहे. अत्यावश्यक संरक्षण सेवांशी निगडित असलेल्या कोणालाही संप करता येणार नाही असा एक अध्यादेश असून त्याचे विधेयक संसदेत मंजूर करून घेण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे.

राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेत (नीट) अन्य मागासवर्गीयांना केंद्र सरकारने आरक्षण ठेवावे अशी मागणी विरोधक संसद अधिवेशनात करणार आहेत. नवे कृषी कायदे रद्द करावेत अशी मागणी अकाली दलासह इतर विरोधी पक्षांनी केली आहे.

ओमप्रकाश बिर्ला, व्यंकय्या नायडू यांनीही बोलावली बैठक

- लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांनीही सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलाविली होती. 

- त्यात त्यांनी सभागृहाचे कामकाज शांततेने आणि नियमानुसार चालण्यासाठी दोन्ही बाजूंनी सहकार्य करावे, गोंधळ होऊ नये, सभात्याग, बहिष्कार करू नये असे आवाहन सर्व पक्षाच्या नेत्यांना केले. 

- राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी देखील शनिवारी सर्वपक्षीय बैठक आयोजिली होती. संसदेचे कामकाज सुरळीत पार पडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे नायडू यांनी सांगितले.

टॅग्स :ParliamentसंसदCentral Governmentकेंद्र सरकार