शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
3
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
4
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
5
"सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
6
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
7
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
8
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
9
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
10
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
11
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
12
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
13
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
14
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
15
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
16
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
18
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
19
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
20
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन

देवभूमीत पावसाचे तांडव; तीन दिवसांमध्ये ७४ बळी, हिमाचलमध्ये १०,००० कोटींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 06:11 IST

शिमल्याच्या समर हिल परिसरात गुरुवारी सलग चौथ्या दिवशी बचाव कार्य सुरू आहे.

शिमला :हिमाचल प्रदेशात आतापर्यंत सरासरीच्या दीडपट पाऊस झाला असून, मंडी, शिमला, हमीरपूर, कांगडा आणि बिलासपूर जिल्ह्यांत जास्त विध्वंस झाला आहे. या पावसामुळे सुमारे १०,००० कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज असून, तीन दिवसांत ७४ जणांचा मृत्यू झाला असून, २ हजारांहून जास्त जणांना वाचवण्यात आले. तर पावसाळा सुरू झाल्यापासून २१७ जणांनी प्राण गमाविले आहेत. राज्य सरकारने केंद्राकडे ६,६०० कोटी रुपयांची मदत मागितली आहे. 

मंडी जिल्ह्यात सामान्यपेक्षा ३१७ टक्के, बिलासपूरमध्ये २२५ टक्के आणि शिमलामध्ये १९१ टक्के अधिक पाऊस झाला. ८००हून अधिक रस्ते, ११३५ विद्युत ट्रान्स्फॉर्मर आणि २८५ पिण्याच्या पाण्याच्या योजना ठप्प झाल्या आहेत. रस्ते बंद झाल्यामुळे १८०० हून अधिक मार्गावरील बससेवा तीन दिवसांपासून ठप्प आहे. ११ ते १७ ऑगस्टदरम्यान राज्यात सामान्यत: ६४ मिमी पाऊस पडतो. मात्र, यावेळी १३५.१ मिमी पाऊस झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली. (वृत्तसंस्था)

१४ मृतदेह सापडले; ७ अजूनही बेपत्ता

शिमल्याच्या समर हिल परिसरात गुरुवारी सलग चौथ्या दिवशी बचाव कार्य सुरू आहे. येथे १४ ऑगस्ट रोजी शिवमंदिरावर दरड कोसळली होती. या अपघातात आतापर्यंत १४ जणांचे मृतदेह सापडले, तर ७ अजूनही बेपत्ता आहेत.

उत्तराखंडमध्ये शेकडो संसार उघड्यावर

उत्तराखंड राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे म्हणणे आहे की, या हंगामात राज्याचे आतापर्यंत ६५० कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. शेकडो लोकांचे संसार उघड्यावर आले आहेत. सततच्या भूस्खलनामुळे लोक घरसामान बांधून सुरक्षित ठिकाणी जायला निघाले आहेत.

महाराष्ट्रासह या राज्यांना अजून प्रतीक्षाच

पुढील दाेन दिवसांमध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहार या भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे. छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल व ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पंजाबच्या आठ जिल्ह्यांमध्ये पूर

अमृतसर : मुसळधार पावसामुळे पंजाबमधील आठ जिल्हे पुराच्या तडाख्यात सापडले आहेत. भाक्रा धरणाचे दरवाजे उघडल्याने सतलज नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. रोपर, होशियारपूर, गुरुदासपूर, कपूरथला, अमृतसर, तरनतारन आणि फिरोजपूरला पुराच्या पाण्याने वेढले आहे. गुरुदासपूरच्या श्री हरगोबिंदपुरा येथे पावसाच्या नाल्याचे पाणी पाहण्यासाठी गेलेली दोन मुले वाहून गेली. होशियारपूरमधील अनेक गावे रिकामी करण्यात आली आहेत.

 

 

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेश