शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

यमुनेचा दिल्लीला विळखा! जनजीवन ठप्प, मोठ्या प्रमाणावर हानी; हजारो लोकांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 10:09 IST

दिल्लीत तीन दिवसांपासून पाऊस नसताना परप्रांतांमधून आलेल्या महापुराचे पाणी शिरल्यामुळे पूर्व आणि उत्तर दिल्लीसह बदरपूर ते जैतपूरपर्यंत किनाऱ्यावरील विविध भागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

सुनील चावकेनवी दिल्ली : हरयाणा, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांतील अतिवृष्टीमुळे यमुना नदी बेकाबू होऊन २०८.६२ मीटर ऐतिहासिक पातळीवर वाहू लागल्यामुळे गुरुवारी राजधानी दिल्ली पुराच्या विळख्यात सापडली. धोक्याच्या पातळीच्या २०५.३३ मीटरपेक्षा तब्बल सव्वातीन मीटर वर वाहणाऱ्या यमुना नदीने पूर्व आणि उत्तर दिल्लीतील विविध भागांना वेढा घालून दिल्लीचे जनजीवन पार विस्कळीत करून टाकले आहे. सुमारे २० हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

दिल्लीत तीन दिवसांपासून पाऊस नसताना परप्रांतांमधून आलेल्या महापुराचे पाणी शिरल्यामुळे पूर्व आणि उत्तर दिल्लीसह बदरपूर ते जैतपूरपर्यंत किनाऱ्यावरील विविध भागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान, यमुनेच्या पाण्याची पातळी शुक्रवारपर्यंत ओसरू लागेल, असा दिलासा देणारा अंदाज केंद्रीय जल आयोगाने वर्तवला आहे.

काठावरील लोकांचे हालपाण्यामुळे यमुनेच्या काठावर राहणाऱ्या सुमारे ४५ हजार रहिवाशांपैकी बुधवारी ९ हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होते. 

हिमाचलमध्ये २९० पर्यटक अडकले१०२० महामार्ग बंदच६० हजार पर्यटकांना आतापर्यंत बाहेर काढले२५ हजार पर्यटकांना कुल्लू आणि मनालीतून सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले.८८ लोकांचा मृत्यू, तर १०० जखमी१६ लोक अद्याप बेपत्ता१,३१२ कोटी रुपयांचे नुकसान (केंद्र सरकारनुसार) ४,००० कोटी रुपयांचे नुकसान (राज्य सरकारनुसार) ७२ जिल्ह्यांना पुराचा वेढा

भारतातील  ७२ टक्के जिल्ह्यांना पुराचा गंभीर फटका बसला असून, त्यापैकी केवळ २५ टक्के जिल्ह्यांमध्ये पूर अंदाज केंद्रे किंवा पूर्व चेतावणी प्रणाली असल्याची माहिती समोर आली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये सर्वांत कमी पूर अंदाज केंद्रे आहेत. त्यामुळे पर्यटकांना माहिती मिळण्यात अडचण आली.

टॅग्स :Rainपाऊसdelhiदिल्ली