शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने केरळला झोडपले, तीन जिल्ह्यांत रेड अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 09:45 IST

मुख्यमंत्री विजयन यांनी  जिल्हाधिकारी आणि अन्य अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे

पथनमथिट्टा/इडुक्की (केरळ) : शनिवारी रात्रीपासून  केरळच्या विविध भागात होत असलेल्या जोरदार पावसामुळे हवामान विभागाने इडुक्की, एर्नाकुलम आणि त्रिसूर या जिल्ह्यांत रविवारसाठी रेड अलर्ट घोषित केला आहे. केरळमध्ये यापूर्वी आलेल्या पुरात १८ लोकांचा मृत्यू झाला होता.मुख्यमंत्री पी. विजयन यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की,   जोरदार पावसामुळे  भूस्खलन आणि अन्य धोकादायक घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासन आणि जनतेने अति सावधान राहावे. पूरप्रवण आणि भूस्खलन होणाऱ्या भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी किंवा नजीकच्या मदत छावण्यात हलविण्यात यावे. 

मुख्यमंत्री विजयन यांनी  जिल्हाधिकारी आणि अन्य अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. जोरदार पावसामुळे साबरीमला येथील श्री अय्यप्पा मंदिर दर्शनासाठी पुढील तीन ते चार दिवस भाविकांची संख्या मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे यात म्हटले आहे.जोरदार पावसामुळे केरळमधील विविध धरणांची पाणी पातळी धोक्याच्या पातळीपर्यंत वाढली आहे. त्यामुळे सरकारने चेरुथोनी धरणाचा एक दरवाजा दुपारी उघडला. केरळचे जलसंसाधन मंत्री रोशी ऑगस्टिन यांंनी  फेसबुकवरील पोस्टमध्ये सांगितले की,  केरळच्या दक्षिण भागातील जोरदार पावसामुळे धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचा एक दरवाजा ४० सेंटीमीटर उघडण्याचा निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :RainपाऊसKeralaकेरळfloodपूर