शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्रात पाऊस, वादळाचे ५० बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 04:25 IST

राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्राच्या अनेक भागांत मंगळवारी रात्री बिगरमोसमी पाऊस, धुळीचे वादळ आणि विजा कोसळून ५० जण ठार, तर अनेक जण जखमी झाले, असे बुधवारी अधिकाऱ्यांनी सांगितले.

नवी दिल्ली : राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्राच्या अनेक भागांत मंगळवारी रात्री बिगरमोसमी पाऊस, धुळीचे वादळ आणि विजा कोसळून ५० जण ठार, तर अनेक जण जखमी झाले, असे बुधवारी अधिकाऱ्यांनी सांगितले.पावसाशी संबंधित दुर्घटनांत राजस्थानात २१, मध्यप्रदेशात १५, गुजरातेत १० आणि महाराष्ट्रात तीन जणांना जीव गमवावा लागला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये पावसामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल टिष्ट्वटरद्वारे तीव्र दु:ख व्यक्त केले. मोदी यांनी फक्त त्यांचे राज्य गुजरातमधील जीवितहानीबद्दलच दु:ख व्यक्त केले, असे म्हणून मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी टीका केली. नंतर पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) टिष्ट्वटरवर म्हटले की, ‘पंतप्रधान मोदी यांनी बिगरमोसमी पाऊस आणि वादळामुळे मध्यप्रदेश, राजस्थान, मणिपूर आणि देशाच्या इतर भागांत झालेल्या जीवितहानीबद्दल दु:ख व्यक्त केले. या संकटात सापडेल्यांना सर्व प्रकारची मदत देण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.’ नैसर्गिक दुर्घटनांत मरण पावलेल्यांच्या जवळच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान पंतप्रधान राष्ट्रीय साहाय्यता निधीतून मंजूर करण्यात आले आहेत, असेही पीएमओने म्हटले आहे.केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी पावसाचा फटका बसलेल्या भागांतील परिस्थितीवर सरकारचे बारकाईने लक्ष असून, या राज्यांना शक्य ती सगळी मदत केली जाईल, असे म्हटले.कमलनाथ टिष्ट्वटरवर म्हणाले की, ‘मोदीजी, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, फक्त गुजरातचे नाही. मध्यप्रदेशातही दहा जणांचा पाऊस, वीज व वादळाने बळी गेला आहे; परंतु तुमच्या भावना फक्त गुजरातपुरत्याच मर्यादित राहिल्या आहेत. भलेही तुमच्या पक्षाचे इकडे सरकार नाही, तरीही येथे लोक राहतात.’भाजपने नाथ हे नैसर्गिक दुर्घटनांत मरण पावलेल्यांवरून राजकारण करीत असल्याचा आरोप केला. भाजपचे प्रसारमाध्यम प्रमुख व राज्यसभा सदस्य अनिल बलुनी यांनी दिल्लीत म्हटले की, ‘नाथ यांना नैसर्गिक दुर्घटनांत हानी झाल्यावर मदतीसाठी केंद्राला त्याची आधी माहिती द्यावी लागते, या प्रक्रियेची माहिती आहे. तरीही ते टिष्ट्वटरद्वारे टीका करून राजकारण करीत आहेत.’>पिकांचीही हानीया पावसाने गुजरात आणि राजस्थानात पिकांचीही हानी झाली आहे. राजस्थान सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपये नुकसानभरपाई जाहीर केली आहे. या घटनांत जनावरेही दगावली आहेत.गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनीही मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये नुकसानभरपाई जाहीर केली आहे. नाशिक जिल्ह्यात वीज पडून ७१ वर्षांची महिला, ३२ वर्षांचा तरुण आणि मंदिराचा पुजारी मरण पावला.