शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

भूस्खलन; हिमाचल-उत्तराखंडमध्ये हजारो पर्यटक अडकले, 300 हून अधिक रस्ते बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 13:36 IST

Rainfall Alert: हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये निसर्गाने आपले रौद्ररुप दाखवायला सुरुवात केली आहे.

Rainfall Alert: मान्सून सक्रिय होताच देशभरात पावसाने हजेरी लावली आहे. मैदानी प्रदेशापासून डोंगराळ राज्यांपर्यंत, पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. डोंगराळ भागात तर पावसाने थैमान घातले आहे. सोमवारी हिमाचल प्रदेशमध्ये अचानक पूर आणि भूस्खलनामुळे चंदीगड-मनाली राष्ट्रीय महामार्ग बंद झाला. यामुळे शेकडो प्रवासी मंडीतच अडकून पडले. भूस्खलन आणि अचानक आलेल्या पुरामुळे 70 किलोमीटर लांबीचा मंडी-पंडोह-कुल्लू रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. 

हिमाचल-उत्तराखंडमध्ये 300 हून अधिक रस्ते ब्लॉकहिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे जवळपास 300 रस्ते बंद झाले आहेत, तर उत्तराखंडमध्ये सुमारे 43 रस्ते बंद आहेत. सीएम धामी यांनी भाविकांना हवामान खराब असल्यास प्रवास थांबवून हवामान खात्याच्या अंदाजाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. हिमाचलमध्ये 140 पॉवर ट्रान्सफॉर्मर खंडित झाले. मुसळधार पावसामुळे मंडी शहरापासून सुमारे 40 किमी अंतरावर असलेल्या पंडोह-कुल्लू मार्गावर खोटीनाल्ला येथे अचानक पूर आल्याने रविवारपासून प्रवासी अडकून पडले आहेत. 

30 जूनपर्यंत सर्व रस्ते खुले केले जातीलसार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे 301 रस्ते बंद झाले आहेत. त्यापैकी 180 रस्ते सोमवारी सायंकाळपर्यंत खुले करण्यात येणार होते. त्याचबरोबर 15 रस्ते आज (मंगळवारी) तर उर्वरित रस्ते 30 जूनपर्यंत खुले करण्यात येणार आहेत. रस्ते मोकळे करण्यासाठी 390 जेसीबी, डोझर आणि टिप्पर तैनात करण्यात आले आहेत. तसेच, विभाग आज एक क्रमांक जारी करेल ज्यावर लोक रस्त्याशी संबंधित समस्या सांगू शकतील.

प्रवाशांसाठी अॅडव्हायझरी जारी राज्यातील संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक आणि पर्यटन पोलिसांनी सोमवारी एक सूचना जारी करून लोकांना अनावश्यक प्रवास टाळावा आणि नदी-नाल्यांजवळील ठिकाणी न जाण्यास सांगितले आहे. यासोबतच लोकांना राफ्टिंगसह इतर जलक्रीडा टाळण्यास सांगितले आहे. याशिवाय, अप्पर शिमला प्रदेश, किन्नौर, मंडी, कुल्लू, लाहौल-स्पीती आणि चंबा जिल्ह्यांमध्ये प्रवास करण्यापूर्वी प्रवाशांनी माहिती मिळवावी, असेही म्हटले आहे.

टॅग्स :landslidesभूस्खलनHimachal Pradeshहिमाचल प्रदेशUttarakhandउत्तराखंडRainपाऊस