शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Indian Railway: प्रवासामुळे थकलेल्या प्रवाशांसाठी रेल्वे करणार खास व्यवस्था, घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 15:18 IST

Indian Railway: जर तुम्हीही ट्रेनच्या माध्यमातून वेगवेगळ्या शहरांमध्ये प्रवास करत असाल आणि एखाद्या शहरात पोहोचल्यावर तिथे तुम्हाला हॉटेलसाठी भटकावं लागत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.  

नवी दिल्ली - जर तुम्हीही ट्रेनच्या माध्यमातून वेगवेगळ्या शहरांमध्ये प्रवास करत असाल आणि एखाद्या शहरात पोहोचल्यावर तिथे तुम्हाला हॉटेलसाठी भटकावं लागत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.  रेल्वेची ही सुविधा सुरू झाल्यानंतर आता तुम्हाला मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ट्रेनने उतरल्यानंतर हॉटेलसाठी भटकावे लागणार नाही. दक्षिण मुंबईतील सीएसएमटी येथे एक पॉड हॉटेल तयार करण्यात येत आहे. हे पॉड हॉटेल जूनच्या अखेरीस लोकांसाठी खुले होण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

भारतीय रेल्वेकडून मुंबई महानगरामध्ये अशा प्रकारची ही दुसरी सुविधा असेल. यापूर्वी १७ नोव्हेंबर २०२१ रोजी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्टेशनवर प्रवाशांसाठी एक पॉड हॉटेल सुरू करण्यात आले होते. सीएसएमटीच्या मेन लाईनवर वेटिंग रूमच्या जवळ बनवण्यात येईल.

सीएसएमटीच्या मेन लाईनवर बनणाऱ्या या पॉड हॉटेलमध्ये एका वेळी ५० जणांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मध्य रेल्वेचे पीआरओ शिवाजी सुतार यांनी सांगितले की, रेल्वेला या माध्यमातून ५५.६८ लाख रुपयांचा महसूल मिळेल. उल्लेखनीय बाब म्हणजे पॉड हॉटेलमधील रुमचे भाडे हे पारंपरिक हॉटेलच्या तुलनेत खूप कमी असते. त्यामुळे प्रवाशांची वेळ आणि पैसा हे दोघांचीही बचत होणार आहे.

सेंट्रल रेल्वेकडून ज्या पॉड हॉटेलची या महिन्याच्या अखेरीस सुरुवात होणार आहे. त्यामध्ये लहान लहान खोल्या असतात. त्यांना कॅप्सुल हॉटेल असंही म्हणतात. काही लोक याला सिंगल प्रायव्हेट रूम असंही म्हणतात. येथे प्रवाशांना पायाभूत सुविधा जसे की, आराम करणे आणि त्यांना फ्रेश होण्याची सुविधाही दिली जाते. पॉड हॉटेलमध्ये एअरक्राफ्टच्या कॉकपिटसारख्या खोल्या असताता. तसेच तिथे प्रवाशांसाठी आराम करण्याची आणि फ्रेश होण्याची सोय केलेली असते.  

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेcentral railwayमध्य रेल्वेMumbaiमुंबई