शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षित तिकीट रद्द केल्यानंतर कसा मिळवाल रिफंड?; जाणून घ्या रेल्वेचे नवे नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 10:35 IST

रेल्वेनं तिकीट रिफंड करण्याचे नियम बदलले; नवी नियमावली जाहीर

नवी दिल्ली: आरक्षित करण्यात आलेली तिकीटं रद्द करण्यात आल्यानंतर रिफंड मिळवण्यासाठीचे नियम रेल्वेकडून बदलण्यात आले आहेत. २१ मार्चपासून नवे नियम लागू झालू आहेत. नव्या नियमांनुसार आधीच आरक्षित करण्यात आलेली तिकीटं रद्द करण्यात आल्यास पूर्ण रिफंड देण्यात येईल.१. रेल्वेनं रद्द केलेल्या तिकीटांसाठी-रेल्वे मंत्रालयानं जारी केलेल्या नव्या नियमांनुसार, प्रवासाच्या सहा महिने आधी (प्रवासाच्या आधीचे तीन दिवस वगळून) तिकीट रद्द केल्यास काऊंटरवरुन रिफंड घेता येईल.२. ई-तिकिटांसाठी-नव्या नियमांनुसार ई-तिकिटांचे पैसे आपोआप परत दिले जातील. प्रवाशानं ज्या खात्याचा वापर करून तिकीट आरक्षित केलं, त्याच खात्यात पैसे रिफंड केले जातील. क्रिस आणि आयआरसीटीसी यासाठी आवश्यक ती यंत्रणा तयार करतील.३. रद्द न करण्यात आलेल्या ट्रेन्ससाठी- जर एखाद्या प्रवाशाला प्रवास करायचा नसल्यास, विशेष प्रकरण म्हणून आरक्षित केलेल्या तिकिटासाठी पूर्ण रिफंड दिला जाईल. पीएसआर काऊंटर किंवा ई-तिकीट अशा दोन्हींसाठी हा नियम लागू असेल.४. पीएसआर काऊंटरसाठी- प्रवासी प्रवासाच्या सहा महिने आधीपासून ते प्रवास करण्याच्या तारखेपर्यंत (प्रवासाआधीचे तीन दिवस वगळून) स्टेशनवर टीडीआर (तिकीट डिपॉझिट रिसीट) जमा करू शकतो. यानंतरच्या ६० दिवसांत प्रवाशाला (१० दिवस वगळून) चीफ क्लेम ऑफिसरकडे (सीसीएम) टीडीआरचा तपशील जमा करावा लागेल. त्यानंतर पडताळणी करून त्याला रिफंड दिला जाईल. ई-तिकीटं ऑनलाईन रद्द केली जाऊ शकतात. त्या तिकिटांचं रिफंडदेखील ऑनलाईनच करण्यात येईल. प्रवासी त्यांचं पीसीआर काऊंटरवरील तिकीट १३९ क्रमांकावर संपर्क साधून किंवा आयआरसीटीच्या संकेतस्थळावर जाऊनदेखील रद्द करू शकतात. प्रवासाच्या सहा महिने आधीपासून तिकीट रद्द केलं जाऊ शकतं.  

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे