शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे लवकरच महत्त्वाचा निर्णय घेणार?; १३ लाख कर्मचाऱ्यांना मिळू शकणार लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 08:21 IST

रेल्वेकडून प्रस्तावावर विचार सुरू; सर्व विभागांमधील महाव्यवस्थापकांच्या शिफारशी मागवल्या

नवी दिल्ली: रेल्वेकडून आपल्या १३ लाख कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा दिला जाण्याची शक्यता आहे. तसा विचार रेल्वेकडून सुरू आहे. रेल्वे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना आधीपासूनच 'रेल्वे कर्मचारी आरोग्य योजना' आणि 'केंद्रीय कर्मचारी आरोग्य योजना' यांच्या माध्यमातून आरोग्याच्या सुविधा उपलब्ध आहेत. मात्र आता उपचारांची व्यापकता वाढवण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे. 'कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधा वाढवण्याचा रेल्वेचा विचार आहे. त्यासाठी समग्र आरोग्य विमा योजनेशी संबंधित सर्व पैलू विचारात घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. उपचार, आपत्कालीन परिस्थितीत निर्माण होणाऱ्या आर्थिक अडचणी यासाठी विमा संरक्षण उपलब्ध करून देण्याचा आमचा उद्देश आहे,' असं रेल्वेनं म्हटलं आहे. याबद्दल रेल्वेनं आपले सर्व विभाग आणि उत्पादन युनिट्सच्या महाव्यवस्थापकांकडून प्रस्तावाबद्दल सूचना आणि शिफारसी मागवल्या आहेत.रेल्वेनं देशभरातल्या आपल्या सर्व विभागांकडून नव्या आरोग्य विम्याच्या प्रस्तावाबद्दलच्या सूचना मागितल्या आहेत. त्यानंतर याबद्दलचा अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती रेल्वेनं दिली आहे. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीला ५८६ हेल्थ युनिट्स, ४५ उपविभागीय रुग्णालयं, ५६ विभागीय रुग्णालयं, ८ उत्पादन युनिट रुग्णालयं आणि १६ झोनल रुग्णालयं उपलब्ध आहेत. यामध्ये अडीच हजारांपेक्षा अधिक डॉक्टर्स आणि ३५ हजारांहून अधिक वैद्यकीय कर्मचारी काम करतात.देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना रेल्वेकडे उपलब्ध असणारी आरोग्य यंत्रणा अतिशय उपयोगी ठरली. रेल्वेनं देशभरातील १२५ रुग्णांमधील साडे सहा हजारांहून अधिक बेड्स कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध करून दिले. त्यामुळे स्थानिक आरोग्य यंत्रणेवरील ताण काही प्रमाणात कमी झाला.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे