शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

शेतकरी आंदोलन : रेल्वेनं रद्द केल्या अनेक रेल्वेगाड्या, काहींचा मार्ग बदलला, येथे पाहा संपूर्ण यादी

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: December 2, 2020 11:37 IST

2 डिसेंबर म्हणजे आज नांदेड- अमृतसर एक्सप्रेस ट्रेन (02715)देखील नवी दिल्ली येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या या आंदोलनाचा परिणाम आता रेल्वे सेवांवरही होताना दिसत आहे. 2 डिसेंबर म्हणजे आज नांदेड- अमृतसर एक्सप्रेस ट्रेन (02715)देखील नवी दिल्ली येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली आहे. रेल्वेने म्हटले होते, की रेल्वे सेवा बाधित झाल्याने त्यांना 2,220 कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

नवी दिल्ली - केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या 7 दिवसांपासून पंजाब आणि हरियाणातून आलेल्या शेतकऱ्यांचे दिल्लीच्या सीमांवर आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाचा परिणाम आता रेल्वे सेवांवरही होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तर रेल्वेने अमृतसर आणि पंजाबमधील अनेक महत्वाच्या मार्गांवर धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत. तर काही रेल्वे गाड्या  शार्ट टर्मिनेट, शॉर्ट ओरिजिनेट तसेच काही गाड्यांचा मार्गही बदलला आहे. 

या रेल्वेगाड्या करण्यात आल्या रद्द -उत्तर रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, 2 डिसेंबरपासून सुरू होणारी अजमेर-अमृतसर एक्सप्रेस स्पेशल ट्रेन (09613) रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तीन डिसेंबरपासून सुरू होणारी अमृतसर-अजमेर स्पेशल ट्रेन (09612)देखील रद्द करण्यात आली आहे. 3 डिसेंबरपासून सुरू होणारी 05211 दिब्रूगड-अमृतसर एक्सप्रेस स्पेशल ट्रेनदेखील रद्द करण्यात आली आहे. याशिवाय 3 डिसेंबरपासून सुरू होणारी 05212 अमृतसर-दिब्रूगड विशेष रेल्वेदेखील रद्द करण्यात आली आहे.

या रेल्वे गाड्या करण्यात आल्या शॉर्ट टर्मिनेट -भटिंडा-वाराणसी-भटिंडा एक्सप्रेस (04998/04997) विशेष रेल्वेगाडीदेखील पुढील आदेशाप्रमाणे रद्द करण्यात आली आहे. तसेच 2 डिसेंबर म्हणजे आज नांदेड- अमृतसर एक्सप्रेस ट्रेन (02715)देखील नवी दिल्ली येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली आहे. याशिवाय आजपासून सुरू होणारी बांद्र टर्मिनस-अमृतसर एक्सप्रेस ट्रेन (02925) चंदीगडमध्ये शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल.

या रेल्वेगाड्याचा मार्ग बदलला -दोन डिसेंबरपासून सुरू होणारी अमृतसर-जयनगर एक्सप्रेस (04650/74) अमृतसर तरनतारन- ब्यास मार्गे वळवण्यात आली आहे. दुर्ग-जम्मू तवी एक्सप्रेस (08215) लुधियाना जालंधर कँट-पठानकोट छावनी मार्गे वळविण्यात आली आहे. या शिवाय, 4 डिसेंबरपासून सुरू होणारी रेल्वेगाडी जम्मू तवी-दुर्ग एक्सप्रेस (08216) पठानकोट कँट-जालंधर कँट-लुधियाना मार्गे वळवण्यात आली आहे. 

रेल्वेसेवा बाधित झाल्याने रेल्वेचे कोट्यवधींचे नुकसान -रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्हीके यादव यांनी म्हटले आहे, की रेल्वे ऑपरेटिंग गेल्या दोन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आली होती. तसेच 32 किलो मीटर अंतर सोडून मुख्य मार्गांवर रेल्वे सेवा सामान्यपणे सुरू होती. ते म्हणाले, 23 नोव्हेंबर आणि 30 नोव्हेंबरदरम्यान 94 प्रवासी रेल्वेगाड्यांनी पंजाबमध्ये प्रवेश केला. तर 78 गाड्या राज्यातून बाहेर गेल्या. एवढेच नाही, तर 384 माल असलेल्या तसेच 273 रिकाम्या रेल्वेगाड्यांनीही राज्यात प्रवेश केला आहे. तसेच 373 माल असलेल्या आणि 221 रिकाम्या मालगाड्या राज्यातून बाहेर गेल्या आहेत. 

तत्पूर्वी, रेल्वेने म्हटले होते, की रेल्वे सेवा बाधित झाल्याने त्यांना 2,220 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. तर मंगळवारी सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांत झालेली बैठक यशस्वी झाली नाही. यामुळे शेतकऱ्यांचे आंदोलन आता आणखी तीव्र होताना दिसत आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेFarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संपPunjabपंजाबHaryanaहरयाणाCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी