शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

राजधानी, दुरांतोमधील एसी 2 टायरची जागा आता एसी 3 टायर घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2018 10:31 IST

महसूल वाढवण्यासाठी रेल्वेचा निर्णय

नवी दिल्ली: रेल्वेकडून लवकरच काही राजधानी आणि दुरांतो एक्स्प्रेसमधील एसी 2 टायर डब्यांची जागा एसी 3 टायर डबे घेणार आहेत. पुढील काही महिन्यांमध्ये हे बदल केले जाणार आहेत. एसी 3 टायर कोचला प्रवाशांची सर्वाधिक पसंती मिळत असल्यानं रेल्वेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. तिकीट आरक्षित करुन प्रवास करणारे बहुतांश प्रवासी एसी 3 टायरमधूनच प्रवास करतात. त्यामुळे एसी 3 टायरमधून रेल्वेला सर्वाधिक महसूल मिळतो. त्यामुळे काही एक्स्प्रेस गाड्यांमधील एसी 2 टायरची जागा लवकरच एसी 3 टायर कोचेस घेतील. 'एसी 3 टायरला प्रवाशांची सर्वाधिक पसंती मिळते. त्यामुळे या कोचेसमधून रेल्वेला सर्वाधिक उत्पन्न मिळतं,' अशी माहिती रेल्वेच्या एका अधिकाऱ्यानं 'फायनान्शियल एक्स्प्रेस'ला दिली. एसी 2 टायरला फारसा प्रतिसाद मिळत नसल्यानंही एसी 3 टायरला रेल्वेकडून प्राधान्य दिलं जातं आहे. 2016 मध्ये फ्लेक्सी फेअर/डायनामिक प्रायझिंग आणल्यापासून एसी 2 टायरला प्रवाशांची फारशी पसंती मिळताना दिसत नाही. 'एसी 2 टायरची जागा लवकरच एसी 3 टायर कोचेस घेतील. त्यासाठी राजधानी आणि दुरांतो एक्स्प्रेसच्या मार्गांचा अभ्यास सुरू आहे. विमान कंपन्यांमुळे कोणत्या मार्गांवर एसी 2 टायरला फारसा प्रतिसाद मिळत नाही, तेदेखील पाहिलं जाईल,' अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. 'फ्लेक्सी फेअर स्किममुळे अनेकदा एसी 2 टायर आणि फर्स्ट क्लास एसीचे तिकीट विमान तिकीटापेक्षा महाग होतं. मग अशावेळी लोक रेल्वेला पसंती का देतील?,' असा प्रश्न रेल्वेच्या अधिकाऱ्यानं उपस्थित केला. त्यामुळेच एसी 3 टायर कोचेसची संख्या वाढवण्याचा निर्णय रेल्वेनं घेतल्याचं त्यानं सांगितलं.  

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीticketतिकिट