शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

आता ऑनलाइन वेटिंग तिकिटावरही करता येणार प्रवास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2018 14:47 IST

रेल्वेचे ऑनलाइन बुक केलेले तिकीत कन्फर्म न झाल्याने ऐनवेळी प्रवास रद्द करण्याची वेळ तुमच्यावर आली असेल. मात्र आता तुम्हाला ऑनलाइन वेटिंग तिकिटावरही...

नवी दिल्ली - रेल्वेचे ऑनलाइन बुक केलेले तिकीत कन्फर्म न झाल्याने ऐनवेळी प्रवास रद्द करण्याची वेळ तुमच्यावर आली असेल. मात्र आता तुम्हाला ऑनलाइन वेटिंग तिकिटावरही काउंटरवरून खरेदी केलेल्या तिकिटाप्रमाणेच प्रवास करता येणार आहे.  या संदर्भातील दिल्ली हायकोर्टाचा 2014 साली दिलेला आदेश पुन्हा एकदा लागू झाला आहे.  कारण या आदेशाविरोधात रेल्वेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. काऊंटर तिकीट आणि ई तिकीट घेणाऱ्या प्रवाशांमध्ये भेदभाव होऊ नये यासाठी रेल्वेने सहा महिन्यांच्या आत पावले ऊचलावीत असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने 2014 साली दिले होते. मात्र या आदेशांविरोधात रेल्वेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.  फायनल चार्ट बनल्यानंतरही ज्या प्रवाशांचे ई तिकीट वेटिंगमध्ये राहते. त्यांचे तिकीट आपोआप रद्द होते. मात्र ज्यांनी तिकीट खिडकीवरून वेटिंगचे तिकीट घेतले आहे अशा प्रवाशांना प्रवास करता येतो. तसेच रिकामी सिट असेल तर त्यावरून प्रवासही करता येतो. याविरोधात  वकील विभाष झा यांनी आवाज उठवला होता. दरम्यान, या आदेशाबाबत प्रतिक्रिया देताना रेल्वे प्रशासनाने सांगितले की, न्यायालयाचा संपूर्ण आदेश वाचल्यानंतर आम्ही याबाबत पावले उचलणार आहोत. सध्या 75 टक्के प्रवासी ऑनलाइन तिकीट खरेदी करतात. दिल्ली हायकोर्टाने आपल्या निकालामध्ये सांगितले होते की, चार्ट बनल्यानंतरही वेटिंगवर असलेले ई तिकीट ऑटोमॅटिक रद्द होऊ नयेत. तर संबंधित प्रवाशाला ई तिकीट बुकिंगच्यावेळीच त्यासंदर्भातील पर्याय उपलब्ध व्हावा.  

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेonlineऑनलाइनticketतिकिटnewsबातम्या