शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

...तर १ मे पासून रेल्वे सेवा ठप्प होणार; कामगार संघटना आक्रमक, काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 12:15 IST

सरकार आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याने बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला आहे असं या संयुक्त कामगार संघटनांनी म्हटलं आहे. 

नवी दिल्ली - Railway unions Strike ( Marathi News ) जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी सातत्याने देशभरात अनेक कामगार संघटना आंदोलन करत आहेत. त्यात आता रेल्वे कर्मचाऱ्यांनीही या आंदोलनात उतरण्याचं ठरवलं आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनी दिलेल्या या इशाऱ्यामुळे देशभरात रेल्वे सेवा ठप्प होण्याचीही शक्यता आहे. जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी १ मेपासून बेमुदत संप करणार अशी घोषणा संघटनांनी केली आहे. 

जुन्या पेन्शन योजनेसाठी रेल्वे कर्मचाऱ्यांसह अनेक कामगार संघटना एकत्र आल्यात. त्यात रेल्वे एम्पलॉईज आणि वर्कर्सच्या विविध संघटना आहेत. जाँईट फोरम फॉर रिस्टोरेशन ऑफ ऑल्ड पेन्शन स्कीम अंतर्गत या संघटना एकजूट झाल्यात. जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर १ मे पासून देशभरात रेल्वे सेवा ठप्प करू असा इशारा या संघटनेने दिला आहे. 

याबाबत एक निवेदन जारी करण्यात आले आहे. त्यात आरोप केलाय की, सरकारने नव्या पेन्शन योजनेऐवजी जुनी पेन्शन योजना सुरू करावी. आम्ही ही मागणी करतोय परंतु सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. अशावेळी आमच्याकडे संपाशिवाय कुठलाही मार्ग नाही. विविध रेल्वे संघटना फोरमच्या बॅनरखाली १९ मार्चपासून रेल्वे मंत्रालयाला नोटीस पाठवून संपाबद्दल माहिती देतील. ज्यात संपामुळे देशातील रेल्वे सेवा ठप्प होऊ शकते असं सांगितले जाईल. या संपात रेल्वे कर्मचाऱ्यांसह इतरही सरकारी कर्मचारी असतील अशी माहिती संयुक्त फोरमचे संयोजक गोपाल मिश्रा यांनी दिली आहे. 

दरम्यान, १ मे रोजी कामगार दिन असल्याने हा महत्त्वाचा दिवस आहे. आम्ही जुनी पेन्शन लागू करावी यासाठी अनेकदा निदर्शने केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनाही पत्र पाठवून आग्रह धरला आहे. प्रत्येक बैठकीत आम्ही या मुद्द्यावर जोर देत आहोत. सरकार आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याने बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला आहे असं या संयुक्त कामगार संघटनांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतनrailwayरेल्वे