कोलकाता - पश्चिम बंगालच्या कोलकाता रेल्वे जंक्शन मार्गावरील रानाघाट रेल्वे स्थानकावर एक महिला गाणे गाऊन आपला उदरनिर्वाह करत होती. रानू मंडाल असं या महिलेचं नाव असून त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. फेसबुकवरुन या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात शेअर्स मिळाल्याने रातोरात प्रत्येकाच्या मोबाईल अन् मनामध्ये रानू दी यांनी आपले स्थान मिळवले होते. गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या आवाजातील ये प्यार का नगमा है.. हे गाणं रानू दी यांनी गायिलं होतं. रानू दी यांच्या अंदाज आणि आवाजाने नेटीझन्स मंत्रमुग्ध झाले होते.
रेल्वे स्टेशन गायिका 'रानू दी'चा मेकओव्हर, मुंबईतून आली गाण्याची ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 10:18 IST
अतिशय हालाखीच्या परिस्थितीत, जगण्यासाठी दैनिक संघर्ष करणाऱ्या रानू दी यांचा व्हिडीओ एका तरुणाने शुट करुन फेसबुकवर अपलोड केला होता.
रेल्वे स्टेशन गायिका 'रानू दी'चा मेकओव्हर, मुंबईतून आली गाण्याची ऑफर
ठळक मुद्देअतिशय हालाखीच्या परिस्थितीत, जगण्यासाठी दैनिक संघर्ष करणाऱ्या रानू दी यांचा व्हिडीओ एका तरुणाने शुट करुन फेसबुकवर अपलोड केला होता. मळकट कपडे, राबलेला चेहरा, विस्कटलेले केस या पेहरावातून रानू दी आता उच्च भ्रू महिलांप्रमाणे नटून-थटून जगासमोर आल्या आहेत.