काश्मीरला सर्व शहरांसोबत कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी काम सुरू आहे. आता नवीन वर्षात देशाला मोठी भेट मिळणार आहे. दिल्ली ते श्रीनगरला थेट जोडणारा रेल्वे मार्ग जानेवारीत सुरू होणार आहे. या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेससारख्या लक्झरी गाड्याही चालवण्याची तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः दिल्ली ते श्रीनगर असा पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करणार असल्याची माहिती मिळाली आहे. उद्घाटनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदीरेल्वेने प्रवास करणार आहेत. याबाबत उत्तर रेल्वेचे मुख्य प्रवक्ते हिमांशू शेखर उपाध्याय यांनी माहिती दिली.
मंदिर आणि गुरुद्वारांमधील पुजाऱ्यांना दरमहा 18 हजार रुपये; अरविंद केजरीवालांची घोषणा
उत्तर रेल्वेचे मुख्य प्रवक्ते हिमांशू शेखर उपाध्याय म्हणाले, 'कटरा ते रियासी दरम्यानच्या १७ किलोमीटर लांबीच्या सेक्शनवर काम सुरू आहे. चाचणीचा भाग म्हणून या मार्गावर इंजिन आणि खडींनी भरलेली मालगाडी चालवली जात आहे. अंजी नदीवरही त्याचा प्रयत्न सुरू आहे. अंतिम चाचणी उत्तर मंडळाच्या सुरक्षा आयुक्तांकडून १५ जानेवारीपूर्वी केव्हाही घेतली जाईल. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः दिल्लीहून श्रीनगरला येत वंदे भारतमध्ये प्रवास करू शकतात. उपाध्याय म्हणाले की, कटरा ते रियासी दरम्यानच्या १७ किमी लांबीच्या सेक्शनचे काम पूर्ण झाले आहे. ही प्रक्रिया वेगाने सुरू होती, ती पूर्ण झाली आहे. याशिवाय, येथे सर्वात कठीण गोष्ट म्हणजे T-33 बोगद्याचे बांधकाम वेगाने सुरू आहे, असंही त्यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, सेफ्टी ऑडिटमध्ये काही कमतरता आढळून आल्यास ती दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, भारताच्या स्वातंत्र्यानंतर ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा काश्मीर कोणत्याही प्रकल्पाद्वारे प्रत्येक हंगामात उर्वरित भारताशी जोडले जाईल. १७ किलोमीटरच्या रियासी कटरा सेक्शनमुळे हे घडणार असल्याचे त्यांनी सांगितले. हे काम गुंतागुंतीचे असले तरी भारतीय रेल्वेने ते सिद्ध केले आहे. काश्मीरमधील लोकांसाठीही हा गेम चेंजर ठरेल, असे ते म्हणाले. दिल्लीहून थेट काश्मीरला पोहोचणे ही रेल्वेसाठी मोठी गोष्ट आहे. हे स्वप्न सत्यात उतरल्यासारखे असेल. ते म्हणाले की, रेल्वेने काश्मीर गाठणे हे पायाभूत सुविधांच्या दृष्टीने मोठे पाऊल आहे. याशिवाय पुरवठा साखळीही बळकट होऊन महागाईपासून लोकांना दिलासा मिळणार आहे.
या रल्वेसेवेमुळे काश्मिरमध्ये पर्यटक वाढतील. तिकीट दरही माफक असणार आहेत. ११८ किमी लांबीचा काझीगुंड बारामुल्ला २००९ मध्ये सुरू झाला होता. त्यानंतर जून २०१३ मध्ये बनिहाल काझीगुंड विभाग सुरू करण्यात आला. त्यानंतर जुलै २०१४ मध्ये उधमपूर ते कटरा हा २५ किलोमीटरचा प्रवास सुरू झाला. या वर्षी फेब्रुवारीमध्ये बनिहाल आणि सांगलदान रेल्वे स्थानकांदरम्यान इलेक्ट्रिक ट्रेनची चाचणी घेण्यात आली होती. उधमपूर, श्रीनगर आणि बारामुल्ला दरम्यानच्या रेल्वे मार्गाचे काम २००५-०६ मध्ये सुरू झाले होते.