शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

"रस्ते सुद्धा राष्ट्रीय संपत्ती, त्यावर खाजगी गाड्या धावत नाहीत का?", रेल्वेच्या खासगीकरणावर पीयूष गोयलांचा विरोधकांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 14:44 IST

railway minister piyush goyal in lok sabha : पीयूष गोयल यांनी खासगी गुंतवणुकीचे रेल्वेमध्ये स्वागत करत त्यामुळे सुविधांमध्ये सुधारणा होईल, असे सांगितले.

ठळक मुद्देरेल्वे ही एक सरकारी मालमत्ता आहे आणि ती सरकारी राहील. परंतु यात जर खाजगी गुंतवणूक होत असेल तर त्यात कोणालाही अडचण होऊ नये, असे पीयूष गोयल म्हणाले.

नवी दिल्ली : केंद्र सरकारवर रेल्वेचे खासगीकरण केल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. मंगळवारी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी लोकसभेत या विषयावर विरोधकांवर निशाणा साधला. कोणीही कधी असे म्हटले नाही की, रस्त्यावर फक्त सरकारी वाहने धावली पाहिजेत. रस्ते सुद्धा राष्ट्रीय संपत्ती, त्यावर खाजगी गाड्या धावत नाहीत का? असे सांगत पीयूष गोयल यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. (railway minister piyush goyal in lok sabha railway privatization national highway)

रेल्वेमंत्री पीयूष गोयल म्हणाले की, आमच्यावर रेल्वेचे खाजगीकरण केल्याचा आरोप आहे, परंतु कोणीही असे कधी म्हटले नाही की, रस्त्यावर  फक्त सरकारी वाहनेच धावतात. कारण, खासगी आणि सरकारी दोन्हीही वाहने अर्थचक्र पुढे येतात. तसेच, पीयूष गोयल यांनी खासगी गुंतवणुकीचे रेल्वेमध्ये स्वागत करत त्यामुळे सुविधांमध्ये सुधारणा होईल, असे सांगितले. मात्र, रेल्वे पूर्णपणे खासगीकरणाच्या हातात रेल्वे देणार नाही, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच, रेल्वे ही एक सरकारी मालमत्ता आहे आणि ती सरकारी राहील. परंतु यात जर खाजगी गुंतवणूक होत असेल तर त्यात कोणालाही अडचण होऊ नये, असे पीयूष गोयल म्हणाले.

आज आम्हाला रेल्वे स्थानकातील वेटिंग रूम, एस्केलेटर आणि अशा अनेक सुविधांची गरज आहे, त्यामुळे यासाठी गुंतवणुकीची आवश्यक असणार आहे. जवळपास 50 रेल्वे स्थानके निवडली आहेत, जी आधुनिक मार्गाने तयार केली जात आहेत, असे पीयूष गोयल यांनी सांगितले. याचबरोबर, आता नवीन 44 वंदे भारत ट्रेन चालविण्यात येणार आहेत, याची ऑर्डर देण्यात आली आहे. लवकरच मार्ग निश्चित केले जातील आणि ट्रेन सुरू केल्या जातील, असे लोकसभेत पीयूष गोयल म्हणाले.

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांकडून केंद्र सरकारवर सरकारी मालमत्तेचे खाजगीकरण केल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. केवळ रेल्वेच नाही तर बँकांच्या खासगीकरणाचा आरोप केला जात आहे. याचा निषेध म्हणून सोमवारी आणि मंगळवारी बँक युनियनचा संप आहे.

टॅग्स :piyush goyalपीयुष गोयलlok sabhaलोकसभाrailwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे