शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
5
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
6
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
7
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
8
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
9
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
10
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
11
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
12
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
13
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
14
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
15
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
16
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
17
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
18
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
19
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
20
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?

आता कन्फर्म तत्काळ तिकीट मिळणार? रेल्वे करणार नियमात बदल; प्रवाशांचा होणार मोठा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 13:15 IST

Indian Railway Tatkal Ticket Booking: तत्काळ तिकिट बुकिंगवेळी होणाऱ्या अनियमिततेवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वेने काही ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या महिन्याच्या अखेरीस नवी प्रणाली सुरू होण्याची शक्यता आहे.

Indian Railway Tatkal Ticket Booking: भारतीय रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळणे, दिवसेंदिवस अधिकच कठीण होत चालले आहे. भारतीय रेल्वेकडून यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात असतात. भारतीय प्रवासी रेल्वे ट्रेनची सेवाही वाढवली जाते. परंतु, काही मार्ग असे आहेत, ते अत्यंत व्यस्त असतात आणि तिकीट मिळणे कठीण होऊन बसते. तत्काळ तिकीट काढणे आणि ते तिकीट कन्फर्म मिळणे अधिक जिकरीचे होत चालले आहे. यावर समस्येवर भारतीय रेल्वेने रामबाण उतारा शोधून काढला आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्सवर ट्विट करत याबाबत माहिती दिली. 

तिकीट कन्फर्म मिळण्याच्या संदर्भात भारतीय रेल्वेने मोठी तयारी सुरू केली आहे. भारतीय रेल्वे एक नवीन प्रणाली लागू करणार आहे, ज्यामुळे तत्काळ तिकीट बुक करणाऱ्यांना कन्फर्म तिकिटे मिळण्यास मदत होईल, असे म्हटले जात आहे. ट्रेनची तत्काळ तिकिटे बुक करण्यासाठी लवकरच ई-आधार प्रमाणीकरण अनिवार्य केले जाणार आहे. यासाठी रेल्वे सिस्टिममध्ये तशी सुधारणा करणार आहे. अश्विनी वैष्णव यांनी भारतीय रेल्वेच्या नव्या सिस्टिमबाबत महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. 

प्रवाशांचा होणार मोठा फायदा

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्सवर एक पोस्ट करत सांगितले की, भारतीय रेल्वे लवकरच तत्काळ तिकीट बुक करण्यासाठी ई-आधार प्रमाणीकरणाचा वापर सुरू करेल. ही प्रणाली रेल्वेच्या खऱ्या युझर्सना गरजेच्या वेळी कन्फर्म तिकिटे मिळविण्यास मदत करेल, असा दावा अश्विनी वैष्णव यांनी केला आहे. या महिन्याच्या अखेरीस ही प्रणाली सुरू होण्याची शक्यता आहे.

नवीन तिकीट प्रणाली कसे काम करणार?

आयआरसीटीसीची वेबसाइटवर सध्या १३ कोटींहून अधिक सक्रिय युझर्स आहेत. परंतु यापैकी फक्त १० टक्के युझर्सनी आधार पडताळणी केली आहे. काही रिपोर्टनुसार, यासाठीच भारतीय रेल्वे नियम अधिक कडक करणार आहे. जेणेकरून तत्काळ तिकीट बुकिंग प्रक्रिया अधिक मजबूत आणि सुलभ करता येऊ शकेल. फक्त आधार पडताळणी केलेल्या आयआरसीटीसी युझर्सनाच ऑनलाइन तत्काळ तिकीट बुकिंग करण्याची परवानगी मिळेल. ही प्रणाली सुरू झाल्यानंतर, तत्काळ तिकीट बुकिंगसाठी आधार आधारित ओटीपी प्रमाणीकरण आवश्यक असेल.

दरम्यान, तत्काळ तिकिट बुकिंगवेळी होणाऱ्या अनियमिततेवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवरही आधार सत्यापन आधारित तत्काळ तिकीट बुकिंगची यंत्रणा राबवली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आयआरसीटीसीने गेल्या एका वर्षात ३.५ कोटी बनावट युझर्सचे आयडी ब्लॉक केले.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAshwini Vaishnawअश्विनी वैष्णवTravel Tipsट्रॅव्हल टिप्स