शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रवाशांना प्रत्येक तिकिटावर किती सबसिडी मिळते? अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत सांगितलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 14:29 IST

Railway Minister Ashwini Vaishnaw : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील लहान आणि मध्यम रेल्वे स्थानकांचा विकास केला जात आहे, असे एका पूरक प्रश्नाला उत्तर देताना अश्निनी वैष्णव म्हणाले.

Railway Minister Ashwini Vaishnaw  : नवी दिल्ली : देशात सर्वाधिक लोक रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेचे प्रवासी भाडे सुद्धा सर्वात कमी आहे. बसच्या भाड्यापेक्षा ट्रेनचे भाडे खूपच स्वस्त आहे. रेल्वे भाडे कमी असण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे सरकारकडून प्रवासी भाड्यात दिले जाणारे अनुदान म्हणजेच सबसिडी. पण रेल्वे प्रवाशांना किती सबसिडी दिली जाते, हे तुम्हाला माहीत आहे का?

या प्रश्नाचे उत्तर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी संसदेत दिले. ते म्हणाले की, देशातील प्रत्येक रेल्वे प्रवाशाला प्रवासाच्या तिकिटावर ४६ टक्के सबसिडी दिली जाते. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पूरक प्रश्नांना अश्विनी वैष्णव यांनी उत्तर दिले. यावेळी ते म्हणाले की, रेल्वे मंत्रालय दरवर्षी प्रवाशांसाठी सबसिडीवर ५६,९९३ कोटी रुपये खर्च करते.

ज्येष्ठ नागरिक आणि मान्यताप्राप्त पत्रकारांना पूर्वी सबसिडी दिली जात होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ती बंद करण्यात आली आहे. मात्र, ही सबसिडी पुन्हा लागू केली जाणार, अशी शक्यता वर्तविली जात होती. अशावेळी अश्विनी वैष्णव म्हणाले, भारत सरकारने प्रवाशांना दिलेली एकूण सबसिडी ५६,९९३ कोटी रुपये आहे. प्रत्येक १०० रुपयांच्या प्रवासी सेवेची किंमत ५४ रुपये आकारली जाते. सर्व श्रेणीतील प्रवाशांना ४६ टक्के सबसिडी दिली जाते.

याचबरोबर, ज्याप्रमाणे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देश रस्त्यांनी जोडला गेला. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील लहान आणि मध्यम रेल्वे स्थानकांचा विकास केला जात आहे, असे एका पूरक प्रश्नाला उत्तर देताना अश्निनी वैष्णव म्हणाले. तसेच, देशातील रेल्वे स्थानक अपग्रेडेशनबाबत अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली. सरकारने सर्वात मोठा रेल्वे स्टेशन अपग्रेडेशन कार्यक्रम सुरू केला आहे. सध्या देशभरात जवळपास १,३०० रेल्वे स्थानके अपग्रेड केली जात आहेत, असे अश्निनी वैष्णव यांनी सांगितले.

टॅग्स :Ashwini Vaishnawअश्विनी वैष्णवrailwayरेल्वे