शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
4
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
5
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
6
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
7
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
8
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
9
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
10
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
11
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
12
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
13
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
14
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
15
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
16
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
17
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
18
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
19
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
20
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड

तिस्ता सेटलवाडांच्या कार्यालयावर छापे

By admin | Updated: July 15, 2015 02:35 IST

सबरंग कम्युनिकेशन्स आणि त्याच्या संचालिका तिस्ता सेटलवाड व त्यांचे पती जावेद आनंद यांच्या कार्यालयासह मुंबईतील तीन ठिकाणी केंद्रीय गुप्तचर खात्याच्या

मुंबई : सबरंग कम्युनिकेशन्स आणि त्याच्या संचालिका तिस्ता सेटलवाड व त्यांचे पती जावेद आनंद यांच्या कार्यालयासह मुंबईतील तीन ठिकाणी केंद्रीय गुप्तचर खात्याच्या (सीबीआय) १६ जणांच्या तुकडीने मंगळवारी छापे घातले. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या परवानगीशिवाय आणि नोंदणी न करता विदेशातून देणग्या स्वीकारल्याबद्दल सीबीआयने ८ जुलै रोजी सबरंग कम्युनिकेशन्सविरुद्ध गुन्हेगारी स्वरूपाचा कट करणे आणि विदेशी साह्य नियमन कायद्याचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल केला होता. आरोपांना पुष्टी देणारी काही महत्त्वाची कागदपत्रे या छाप्यात हाती लागल्याचे सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. सीबीआयचे प्रवक्ते कांचन प्रसाद म्हणाले की, सीबीआयने सबरंग कम्युनिकेशन्स अँड पब्लिशिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि त्याचे संचालक जावेद आनंद, तिस्ता सेटलवाड, पेशीमम गुलाम महमंद आणि अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा भारतीय दंड विधानाचे कलम १२० (बी), त्यातील विदेशी चलन नियमन कायदा, २०१० चे कलम ३५, ३७, त्यात कलम ३,११ आणि १९ ते विदेशी चलन नियमन कायदा, १९७६ चे कलम २३,२५ मधील कलम ४,६ आणि १३ अन्वये दाखल झाला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाची परवानगी न घेता विदेशी साह्य बेकायदेशीरपणे स्वीकारून गुन्हेगारी स्वरूपाचा कट केल्याचा हा गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा सिद्ध झाल्यास ५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. तिस्ता सेटलवाड यांनी पूर्ण सहकार्य करण्याबाबतचे पत्र सीबीआयला लिहिले होते आणि जे तथाकथित गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांच्या चौकशीत आम्ही पूर्ण सहकार्य करू, असेही त्यात म्हटले होते. म्हणूनच ही छाप्यांची सगळी कारवाई आमच्या आकलनशक्तीबाहेरची आहे, असे सेटलवाड म्हणाल्या. हा राजकीय सूड असून, त्यातून आमचा अपमान करण्याचा व आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही सेटलवाड यांनी केला. (प्रतिनिधी)मुंबई : सबरंग कम्युनिकेशन्स आणि त्याच्या संचालिका तिस्ता सेटलवाड व त्यांचे पती जावेद आनंद यांच्या कार्यालयासह मुंबईतील तीन ठिकाणी केंद्रीय गुप्तचर खात्याच्या (सीबीआय) १६ जणांच्या तुकडीने मंगळवारी छापे घातले. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या परवानगीशिवाय आणि नोंदणी न करता विदेशातून देणग्या स्वीकारल्याबद्दल सीबीआयने ८ जुलै रोजी सबरंग कम्युनिकेशन्सविरुद्ध गुन्हेगारी स्वरूपाचा कट करणे आणि विदेशी साह्य नियमन कायद्याचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल केला होता. आरोपांना पुष्टी देणारी काही महत्त्वाची कागदपत्रे या छाप्यात हाती लागल्याचे सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. सीबीआयचे प्रवक्ते कांचन प्रसाद म्हणाले की, सीबीआयने सबरंग कम्युनिकेशन्स अँड पब्लिशिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि त्याचे संचालक जावेद आनंद, तिस्ता सेटलवाड, पेशीमम गुलाम महमंद आणि अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा भारतीय दंड विधानाचे कलम १२० (बी), त्यातील विदेशी चलन नियमन कायदा, २०१० चे कलम ३५, ३७, त्यात कलम ३,११ आणि १९ ते विदेशी चलन नियमन कायदा, १९७६ चे कलम २३,२५ मधील कलम ४,६ आणि १३ अन्वये दाखल झाला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाची परवानगी न घेता विदेशी साह्य बेकायदेशीरपणे स्वीकारून गुन्हेगारी स्वरूपाचा कट केल्याचा हा गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा सिद्ध झाल्यास ५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. तिस्ता सेटलवाड यांनी पूर्ण सहकार्य करण्याबाबतचे पत्र सीबीआयला लिहिले होते आणि जे तथाकथित गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांच्या चौकशीत आम्ही पूर्ण सहकार्य करू, असेही त्यात म्हटले होते. म्हणूनच ही छाप्यांची सगळी कारवाई आमच्या आकलनशक्तीबाहेरची आहे, असे सेटलवाड म्हणाल्या. हा राजकीय सूड असून, त्यातून आमचा अपमान करण्याचा व आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही सेटलवाड यांनी केला. (प्रतिनिधी)छाप्यांमुळे धक्कातिस्ता सेटलवाड यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितले, की चौकशीसाठी आम्ही पूर्ण सहकार्य करू, असे आम्ही न्यायालयाला आधीच सांगितलेले असतानाही टाकण्यात आलेल्या छाप्यांमुळे आम्हाला धक्का बसला आहे.