शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आठ राज्यांत ७२ ठिकाणी धाडी; दहशतवादी संबंध उघड करण्यासाठी NIA ची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 08:54 IST

सरकारने काही दिवसांपूर्वी पाकिस्तानस्थित हरविंदर सिंग संधू ऊर्फ रिंडा याला दहशतवादविरोधी कडक कायद्यांतर्गत दहशतवादी घोषित केले होते.

नवी दिल्ली : कुख्यात गुन्हेगार, दहशतवादी गट आणि अमलीपदार्थ तस्कर यांच्यातील संबंधांच्या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आठ राज्यांमध्ये ७२ ठिकाणी धाडी टाकल्या. राजधानी दिल्लीसह महाराष्ट्र, पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशात छापेमारी सुरू आहे. 

सरकारने काही दिवसांपूर्वी पाकिस्तानस्थित हरविंदर सिंग संधू ऊर्फ रिंडा याला दहशतवादविरोधी कडक कायद्यांतर्गत दहशतवादी घोषित केले होते. एका प्रकरणात त्याचे नावही आहे. भारतात आणि विदेशात सक्रिय गुन्हेगारी टोळ्यांकडून पैसे जमा करणे, दिल्ली आणि देशाच्या अन्य भागांतून अतिरेकी कारवायांसाठी तरुणांची भरती करणे आणि प्रतिष्ठित लोकांची हत्या करणे आदी प्रकरणांचा तपास एनआयएने आपल्याकडे घेतलेला आहे. यापूर्वीही एनआयएने एकाचवेळी अनेक ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. 

एफसीआय भ्रष्टाचार : सीबीआयच्याही धाडी         व्यापारी आणि तांदूळ मिलमालक यांच्या फायद्यासाठी निकृष्ट धान्य खरेदी करणाऱ्या भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय) अधिकाऱ्यांविरुद्ध मंगळवारी सीबीआयने मोठी कारवाई केली. भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या चौकशीचा एक भाग म्हणून सीबीआयने पंजाबमधील ३० ठिकाणी धाडी टाकल्या. 

सीबीआयच्या पथकांनी ‘ऑपरेशन कनक २’चा भाग म्हणून धान्य व्यापारी, तांदूळ मिलमालक आणि एफसीआयचे सेवानिवृत्त आणि सेवेतील अधिकारी यांच्या जागेवर छापे टाकण्यास सुरुवात केली. ही कारवाई राजपुरा, सरहिंद, पटियाला, फतेहगढ साहिब, मोहाली, मोगा, फिरोजपूर, लुधियाना, संगरूर आदी भागात करण्यात आली. एफसीआयच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात दुसऱ्यांदा धाडी टाकल्या आहेत. खासगी मिलमालकांकडून पुरवण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या धान्यावर पडदा टाकत अधिकाऱ्यांच्या या समूहाने गुदामात उतरविण्यात आलेल्या प्रतिट्रकवर १००० ते ४००० रुपये लाच घेतली असा ठपका आहे. त्यानंतर ही रक्कम कनिष्ठ अधिकाऱ्यांपासून उच्च स्तरावरील अधिकाऱ्यांपर्यंत वितरित केली.   

टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणा