शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी बेपत्ता, शोधून देणा-यास मिळणार बक्षीस !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2017 18:01 IST

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अमेठीतल्या मतदारसंघात ते हरवल्याचे पोस्टर्स जागोजागी लागल्यामुळे काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडालीय.

अमेठी, दि. 8 - काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अमेठीतल्या मतदारसंघात ते हरवल्याचे पोस्टर्स जागोजागी लागल्यामुळे काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडालीय. या पोस्टर्समध्ये राहुल गांधींना शोधणा-यास बक्षीस देणार असल्याचंही जाहीर करण्यात आलंय. विशेष म्हणजे यातील काही पोस्टर्स हे अमेठीतल्या काँग्रेसच्या कार्यालयांसमोर झळकावण्यात आलेत.अमेठी विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रचारासाठी राहुल गांधी मतदारसंघात आले होते. मात्र त्यानंतर ते स्वतःच्या मतदारसंघात फिरकलेच नाहीत, अशी अमेठीतल्या नागरिकांची तक्रार आहे. खासदार निधीतून कोणतीही विकासकामे होत नसल्याची खंतही नागरिकांनी व्यक्त केली आहे. पोस्टरमधून नागरिकांनी आपली व्यथा मांडलीय.‘अमेठीचे माननीय खासदार श्री राहुल गांधी अमेठीमधून बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे खासदारांच्या निधीतून होणारी विकासकामं त्यांच्या कार्यकाळात बंद आहेत. राहुल गांधींच्या या व्यवहारामुळे सामान्य नागरिकांच्या मनात फसवणुकीची भावना आहे. अमेठीला राहुल गांधींची माहिती देणा-या व्यक्तीचा योग्य बक्षीस देऊन सन्मान केला जाणार आहे, असे या पोस्टरवर लिहिले आहे. पोस्टरच्या खालच्या बाजूला अमेठी जनतेनं हे निवेदन दिल्याचं म्हटलं आहे.राहुल गांधींच्या पोस्टरप्रकरणी आता काँग्रेसनंही भाजपावर निशाणा साधला आहे. काँग्रसचे जिल्हाध्यक्ष योगेंद्र मिश्रा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा राहुल गांधी यांना बदनाम करण्यासाठी पोस्टर लावत असल्याचा आरोप केला. राहुल गांधी काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत. कामाच्या व्यापामुळे त्यांना सतत अमेठीत येणे शक्य नाही, असं म्हणत योगेंद्र मिश्रा यांनी राहुल गांधींची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.