शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

राहुल गांधींनी दाखवले आक्षेप टिपण; मोदी, सीतारामन, खोटे बोलल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 05:08 IST

राफेल विमानांच्या खरेदी व्यवहारावरून आक्रमक झालेले काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी संरक्षण मंत्रालयात राफेलच्या करारासाठी स्थापन केलेल्या समितीच्या सदस्यांचा आक्षेप असलेले टिपण जाहीर केले.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : राफेल विमानांच्या खरेदी व्यवहारावरून आक्रमक झालेले काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी संरक्षण मंत्रालयात राफेलच्या करारासाठी स्थापन केलेल्या समितीच्या सदस्यांचा आक्षेप असलेले टिपण जाहीर केले. सदस्य कोस्ट सल्लागार एम.पी. सिंह, अर्थ व्यवस्थापक ए. आर. सुळे, अर्थ व्यवस्थापक (हवाई दल) आणि संयुक्त सचिव राजीव वर्मा यांनी १ जून २०१६ रोजी लढाऊविमानांच्या खरेदीसाठी बनवलेल्या फाईलवर आपला आक्षेप नोंदवला होता. हा आक्षेप करार करणाऱ्या टीमचे अध्यक्ष असलेले डेप्युटी चीफ आॅफ एअर स्टाफ यांना पाठवला गेला.या अधिकाºयांनी दोन मुद्यांवर गंभीर आक्षेप घेतला होता. १) राफेल विमानांची किंमत व २) राफेलचा ताफा भारतात येण्याची मुदत. या दोन मुद्यांवर वायुसेनेला कळविले की, डसॉल्टने दिलेली किंमत युपीए सरकारने ठरवलेल्या अटींच्या तुलनेत खूप जास्त आहे. या अधिकाºयांचे म्हणणे होते की डसॉल्ट एका वर्षात फक्त ८ विमान तयार करू शकते. त्यानुसार भारतात विमाने वेळेत मिळणार नाहीत. गांधी यांनी आरोप केला की मोदी, संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन आणि अर्थमंत्री अरुण जेटली हे संसदेत खोटे बोलले.भ्रष्टाचार झाला तो इथेचराहुल गांधी म्हणाले की, भारताच्या गरजांनुसार ज्या गोष्टी विमानात जोडल्या जायला हव्या होत्या त्यासाठी यूपीए सरकारने १२६ विमानांसाठी जे पैसे निश्चित केले ते मोदी यांनी २५ विमानांसाठी मान्य केले. विमानांची संख्या कमी झाली; परंतु त्यासाठीचा पैसा कमी केला गेला नाही. भ्रष्टाचार झाला तो येथेच. कारण मोदी अनिल अंबानी यांना ३० हजार कोटी देत होते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी