शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी चित्रपटास गेल्याचा मुद्दा: भाजपाने खासगी आयुष्यात डोकावू नये ,समाजवादी पक्षाचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:40 IST

हिमाचल प्रदेश व गुजरात विधानसभा निवडणुकांत पराभव झाल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी दिल्लीतील एका चित्रपटगृहात इंग्रजी चित्रपट पाहावयास गेले होते.

नवी दिल्ली : कोणाच्या खासगी आयुष्यात डोकवायच्या मानसिकतेतून संकुचित मनोवृत्तीच्या बाहेर पडावे असा सल्ला समाजवादी पक्षाने बुधवारी भाजपाला दिला आहे.हिमाचल प्रदेश व गुजरात विधानसभा निवडणुकांत पराभव झाल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी दिल्लीतील एका चित्रपटगृहात इंग्रजी चित्रपट पाहावयास गेले होते. त्याबद्दल भाजपाने राहुलवर टीका केली होती.राहुल गांधी अर्धवेळ पक्षाध्यक्ष आहेत, असे भाजपाने म्हटले होते.त्यावर समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल म्हणाले की भाजपा एवढा संकुचित मनोवृत्तीचा का आहे? ते कोणाच्या खासगी आयुष्याशी का संबंध जोडतात? भाजपा नेत्यांची पातळी फारच घसरली आहे. त्यांनी या प्रकारच्या मानसिकतेतून बाहेर पडणे हे त्यांच्या गरजेचे आहे. काँग्रेसनेही भाजपाच्या टीकेचा समाचार घेतला आहे. कोणाच्या खासगी आयुष्यात भाजपाने डोकावण्याचे कारण नाही. शिवाय निवडणूक निकाल व चित्रपट पाहण्यास जाणे, याचा संबंध जोडणे गैर आहे. राहुल यांनी चित्रपटांविषयी रस असल्याबद्दल भाजपाने टीका करण्याचे कारण नाही.स्टार वॉर्स-राहुल गांधी पीव्हीआर चाणक्य चित्रपटगृहात ‘स्टार वॉर्स’ पाहायला गेले होते. सोमवारी गुजरात व हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला व त्यात काँग्रेसचा पराभव झाला होता. त्यानंतर गांधी यांची राजकारणाशी काही बांधिलकी नाही अशी चर्चा व टीका सुरू झाली. भाजपानेच या चर्चेला व टीकेला सुरुवात केली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSamajwadi Partyसमाजवादी पार्टी