शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांनी काढली राहुल गांधींच्या सोशल मीडिया प्रमुखाची 'कुंडली'; काँग्रेस अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 11:29 IST

रम्या यांनी हा कारभार हाती घेतल्यापासून राहुल यांच्या ट्विटर अकाऊंटवरून मोदी सरकारच्या कारभारावर अचूक व प्रभावी पद्धतीने निशाणा साधण्याचे प्रमाण वाढले आहे.

नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या माजी खासदार दिव्या स्पंदना उर्फ रम्या यांच्यामुळे काँग्रेस पक्ष अडचणीत येण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून रम्या या राहुल यांची सोशल मीडियावरील खात्यांची जबाबदारी सांभाळत आहेत. रम्या यांनी हा कारभार हाती घेतल्यापासून राहुल यांच्या ट्विटर अकाऊंटवरून मोदी सरकारच्या कारभारावर अचूक व प्रभावी पद्धतीने निशाणा साधण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकांकडून या बदलाचे स्वागतही करण्यात आले होते. परंतु, आता विरोधकांनी रम्या यांच्या पूर्वीच्या व्यावसायिक संबंधांचे पुरावे समोर आणल्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार रम्या यांचे मद्यसम्राट विजय मल्ल्या याच्याशी व्यावसायिक संबंध होते. रम्या या मल्ल्या यांच्या मालकीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या आयपीएल टीमच्या सदिच्छादूत (ब्रँड अॅम्बेसिडर) होत्या. 2010 मधील रम्या यांची हाँगकाँग येथील सहल ही मल्ल्या पुरस्कृत होती. स्वत: रम्या यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून तशी माहिती दिली होती. 

2012 साली रम्या यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.  त्यानंतर किंगफिशर एअरलाईन्सच्या पडत्या काळातही रम्या यांनी मल्ल्या यांची समर्थन करणारी केलेली काही ट्विटस विरोधकांकडून समोर आणण्यात आली आहेत. विजय मल्ल्या हा चांगला व सच्चा माणूस आहे. किंगफिशर या सगळ्यातून लवकरच बाहेर पडेल, अशी आशा रम्या यांनी व्यक्त केली होती.

परंतु गेल्या काही काळात रम्या यांचा सूर पूर्णपणे पालटला. इतके दिवस मल्ल्या यांची स्तुती करणाऱ्या रम्या यांनी ललित मोदी व मल्ल्या फरार झाल्याच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला लक्ष्य करायला सुरूवात केली. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावरही त्यांनी गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले होते. राहुल गांधी यांच्या सोशल मीडिया सल्लागार झाल्यापासून त्यांच्या मोदी सरकारविरुद्धच्या टीकेचा सूर आणखीनच तीव्र झाला होता. त्यामुळे आता विरोधकांकडून रम्या यांच्या जुन्या ट्विटसचा दाखला देत काँग्रेसला पेचात पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, काँग्रेसकडून अद्यापपर्यंत या टीकेला कोणतेही प्रत्युत्तर देण्यात आलेले नाही. 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीVijay Mallyaविजय मल्ल्या