शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 20:19 IST

Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी आपल्या पत्रात मच्छिमारांच्या सुटकेसाठी आणि जप्त केलेल्या बोटींसाठी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांशी बोलण्यास सांगितले आहे.

नवी दिल्ली : श्रीलंकेच्या नौदलाकडून वारंवार तामिळ मच्छिमारांवर कारवाई केली जात असल्याचे समोर आले आहे. अनेक तामिळ मच्छिमारांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र लिहिले असून श्रीलंकेच्या नौदलाकडून वारंवार पकडल्या जाणाऱ्या तामिळ मच्छिमारांची सुटका करण्याची मागणी केली आहे. 

राहुल गांधी यांनी आपल्या पत्रात मच्छिमारांच्या सुटकेसाठी आणि जप्त केलेल्या बोटींसाठी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांशी बोलण्यास सांगितले आहे. तसेच, २१ सप्टेंबर २०२४ रोजी श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी ३७ तमिळ मच्छिमारांना अटक केली. त्यांच्या बोटीही जप्त करण्यात आल्या आहेत. मायलादुथुराई येथील काँग्रेस खासदार आर सुधा यांनी मला या प्रकरणाची माहिती दिली, असे राहुल गांधींनी पत्रात म्हटले आहे.

अटक करण्यात आलेले मच्छिमार हे किनाऱ्याजवळ छोट्या प्रमाणात काम करतात. घटनेच्या दिवशी त्यांनी संकटात सापडलेल्या श्रीलंकेच्या बोटीला वाचवण्याचा प्रयत्न केला होता. मच्छिमारांनी बचाव मदतीसाठी श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्याचे सांगण्यात आले. असे असतानाही आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषा ओलांडल्याच्या आरोपावरून श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी मच्छिमारांना अटक केली. जप्त केलेल्या मासेमारी नौका सामूहिक संसाधनातून खरेदी करण्यात आल्या होत्या, असेही राहुल गांधींनी पत्रात लिहिले आहे.

श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांकडून लहान आणि सीमांत भारतीय मच्छिमारांना अटक करणे, मालमत्ता जप्त करणे आणि मोठा दंड ठोठावण्याच्या वारंवार घडणाऱ्या घटनांचा तीव्र निषेध केला पाहिजे. तसेच, मी तुम्हाला विनंती करतो की, हे प्रकरण श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांकडे मांडावे आणि मच्छिमार आणि त्यांच्या बोटींची तात्काळ सुटका करावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी पत्राद्वारे केली आहे.

एमके स्टॅलिन यांनीही परराष्ट्रमंत्र्यांना लिहिलं होतं पत्रतत्पूर्वी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनीही परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना पत्र लिहिले होते, ज्यात त्यांनी म्हटले होते की, अलिकडच्या आठवड्यात तामिळनाडूतील मच्छिमारांना श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांकडून ताब्यात घेण्याच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. यासोबतच राज्यातील मच्छीमारांचे पारंपारिक हक्क अबाधित राखण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आवश्यक ठोस पावले उचलण्याची विनंती मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी केली होती.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीS. Jaishankarएस. जयशंकरSri Lankaश्रीलंकाTamilnaduतामिळनाडूfishermanमच्छीमारFishermanमच्छीमार