शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पाटी कोरी झाल्याने काँग्रेस उभारी घेईल - राहुल गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 02:03 IST

आता पाटी कोरी झाल्याने काँग्रेस पक्षास नवी संधी मिळाली आहे. या संधीचा फायदा घेऊन काँग्रेस पक्ष नव्याने उभारी घेईल, असा विश्वास काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी येथे व्यक्त केला.

सिंगापूर - आता पाटी कोरी झाल्याने काँग्रेस पक्षास नवी संधी मिळाली आहे. या संधीचा फायदा घेऊन काँग्रेस पक्ष नव्याने उभारी घेईल, असा विश्वास काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी येथे व्यक्त केला.सिंगापूरमधील कंपन्यांच्या भारतीय वंशाच्या प्रमुखांसमोर बोलताना त्यांनी स्पष्ट उल्लेख केला नाही परंतु ‘कोºया पाटी’चा संदर्भ २-जी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील आरोपींना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले जाण्याशी असावा. विरोधी पक्षात असलेल्या भाजपाने ‘२-जी’सह अन्य घोटाळ्यांवरून रान उठविले होते.राहुल गांधी म्हणाले की, सन २०१२मध्ये काँग्रेसने वादळ सोसले. सन २०१२ ते २०१४ या काळात सर्व व्यवस्था डळमळीत केल्या गेल्या आणि त्याचे परिणाम आपण पाहिले. आता आमची पाटी कोरी झाली आहे व नव्याने संधी मिळाली आहे.देशात शांतता व सलोखा राहावा यात भाजपाला काही स्वारस्य नाही, असा आरोप करून राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेस म्हणून आम्ही समाजाकडे जे संतुलन असायला हवे अशी व्यवस्था म्हणून पाहतो. याउलट भाजपाला शांतता व सामाजिक सलोख्याची फिकीर नाही. आमच्यापुढे आव्हाने आहेत. तरीही हे सामाजिक अभिसरण शांततेने, सर्वांना सोबत घेऊन व्हावे, असा प्रयत्न आहे.नेताजींना श्रद्धांजलीराहुल गांधी यांनी सिंगापूरमधील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मारकावर जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्याखेरीज त्यांनी येथील सिंगापूर इंडियन असोसिएशनला भेट देऊन तेथील लोकांशी संवाद साधला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस