शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2024 06:13 IST

आदिवासीबहुल छोटा उदयपूर जिल्ह्यातील बोडेली शहरात एका निवडणूक प्रचार सभेला संबोधित करताना शाह बोलत होते.

बोदेली (गुजरात) : वायनाड व रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवत असल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी खोचक टीका केली. अमेठीत हरल्याने ते वायनाडला गेले. आता तेथे पराभव दिसू लागल्याने त्यांनी रायबरेली गाठली. मात्र, रायबरेलीतही ते मोठ्या फरकाने पराभूत होतील, असे शाह म्हणाले.  

आदिवासीबहुल छोटा उदयपूर जिल्ह्यातील बोडेली शहरात एका निवडणूक प्रचार सभेला संबोधित करताना शाह बोलत होते. ते म्हणाले अमेठीतून निवडणूक हरल्यावर ते वायनाडला गेले. आता वायनाडमधून हरणार असल्याचे लक्षात आल्याने ते आता रायबरेलीतून निवडणूक लढवत आहेत. समस्या तुमची आहे, जागेची नाही. तुम्ही रायबरेलीतही मोठ्या फरकाने निवडणूक हराल. तुम्ही पळून गेलात, तरी लोक तुम्हाला हुडकून काढतील, असे अमित शाह म्हणाले.

भाजप सत्तेत असेपर्यंत आरक्षणाला धक्का नाही नरेंद्र मोदींना आणखी एक कार्यकाळ मिळाला, तर ते आरक्षण रद्द करतील, असा खोटा प्रचार राहुल व त्यांचा कंपू करत आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये मोदींना पूर्ण बहुमत मिळाले होते. परंतु, त्यांनी कधीही अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला हात लावला नाही. जोपर्यंत भाजप सत्तेत आहे, तोपर्यंत आरक्षणाला कोणीही हात लावू शकणार नाही, असे शाह म्हणाले.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAmit Shahअमित शाह