शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेसाठी बसपाशी आघाडी होईलच, राहुल गांधींना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 06:26 IST

राहुल गांधी यांना विश्वास; दोन राज्यांत आघाडी न झाल्याचा परिणाम नाही

शीलेश शर्मा

नवी दिल्ली : मध्यप्रदेश व राजस्थानमधील विधानसभा निवडणुकांत काँग्रेसशी आघाडी करण्यास बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी नकार दिला असला, तरी पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस व बसपा यांच्यात निश्चितच समझोता होईल, असा विश्वास काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी व्यक्त केला.

एका परिषदेत राहुल गांधी यांना मायावती यांच्या विधानाविषयी प्रश्न करण्यात आला. ते म्हणाले की, मायावती यांच्या पक्षाने मध्यप्रदेश व राजस्थान या दोन राज्यांमध्ये काँग्रेसशी आघाडी केली नाही, तरी आम्हाला फारसा फरक पडणार नाही. तिथे आम्हाला स्वबळावरच बहुमत मिळेल. राज्यातील आघाडी व केंद्रातील आघाडी यात फरक असल्याचे मायावती यांनी सूचित केल्याचा उल्लेखही राहुल गांधी यांनी यावेळी केला. मध्यप्रदेश व राजस्थानात आघाडी होण्यात काँग्रेसचे काही नेते अडथळे आणत असल्याचा मायावती यांचा आरोप आहे. त्याविषयी राहुल गांधी म्हणाले की, जागावाटपाबाबत आमची नेहमीच चर्चेची तयारी आहे. पुढील वर्षीच्या निवडणुकांनंतर तुमच्या आघाडीला बहुमत मिळाल्यास तुम्ही पंतप्रधान होणार का, असा सवालही त्यांना करण्यात आला. त्यावर राहुल गांधी यांनी अतिशय चतुराईने ‘अन्य पक्षांची तयारी असेल, तर मी पंतप्रधान होईनही’ असे उत्तर दिले.सरकार आल्यास याला प्राधान्यराहुल गांधी सतत मोदी सरकारवर टीका करतात; पण प्रत्यक्ष सरकार आल्यास काय करणार, हे सांगत नाहीत, अशी टीका त्यांच्यावर अनेकदा होत असते; पण आजच्या कार्यक्रमात त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि लघु व मध्यम उद्योगांना मजबूत करणे यावर आम्ही निश्चितच लक्ष केंद्रित करू, असे स्पष्टपणे सांगितले.सध्याचे पंतप्रधान स्वत:चे म्हणणे इतरांवर व जनतेवर लादतात. आम्ही तसे न करता जनतेचे म्हणणे ऐकून घेऊ आणि त्यानुसार निर्णय घेऊ , असे ते म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९