शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

राहुल गांधी गुरुवारी वायनाडमधून अर्ज भरणार, रोड शोही करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 08:03 IST

दक्षिणेवरील अन्याय दूर करण्याचा दावा

वायनाड/नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी निवडणुकीची अर्ज भरण्यासाठी येथे गुरुवारी येणार आहेत, अशी माहिती काँग्रेसचे सरचिटणीस व केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी येथे सांगितले. राहुल गांधी बुधवारी संध्याकाळी कोळीकोड (कालिकत) विमानतळावर येतील आणि गुरुवारी अर्ज भरण्यासाठी जातील, असे सांगतानाच चंडी म्हणाले की, अचानक त्यांच्या कार्यक्रमात बदल झाला तरी ते गुरुवारी सकाळी अर्ज भरण्यासाठी येथे येतील, असे ठरले आहे. अर्ज भरण्याआधी त्यांचा रोड शो होणार आहे.

राहुल गांधी येथून निवडणूक लढवणार असल्याच्या वृत्तामुळे केवळ वायनाडमध्येच नव्हे, तर संपूर्ण केरळमध्ये आनंदाचे वातावरण आहे. प्रथमच एखाद्या राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष केरळमधून निवडणूक लढवत आहे. त्याचा फायदा आम्हाला संपूर्ण राज्यात तसेच दक्षिणेकडील अन्य राज्यांमध्ये होईल. पंतप्रधान मोदी यांनी दक्षिणेकडील राज्यांबाबत कायमच दुजाभाव केला. त्या राज्यांना कधीच महत्त्व दिले नाही. त्यामुळे दक्षिणेकडील राज्यांमध्ये एकाकीपणाची भावना आहे. ही एकाकीपणाची भावना व अन्याय दूर करण्यासाठीच आपण केरळच्या वायनाडमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, असे राहुल गांधी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

बहुसंख्यांकांच्या (हिंदू) मतदारसंघात निवडून येण्याची खात्री नसल्यानेच राहुल गांधी यांनी जिथे अल्पसंख्यांकांची (मुस्लीम) मते अधिक आहेत, अशा मतदारसंघात जाण्याचा निर्णय घेतला, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली होती. त्याला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, आपण मोदींप्रमाणे अल्पसंख्याक व बहुसंख्यांक असा भेद करीत नाही. या देशात हिंदू तरुणही मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहेत. त्याबद्दल वा देशाला भेडसावणाऱ्या मुद्द्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलायला तयार नाहीत. या विषयांवर पत्रकार परिषदेत प्रश्नांना उत्तरे देण्याची हिंमत मोदी यांनी आधी दाखवावी.प्रियांकाही सोबत जाणारवायनाड येथे अर्ज भरण्यासाठी राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी याही जाणार आहेत. तशी माहिती काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने दिली. मात्र त्याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधी