शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi: राहुल गांधी अध्यक्ष न झाल्यास काँग्रेसचं काय होणार? अशोक गहलोत यांचं मोठं विधान, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 09:57 IST

Rahul Gandhi: गेल्या काही वर्षांपासून सोनिया गांधींकडे प्रभारी अध्यक्षपद सोपवून कारभार हाकत असलेल्या काँग्रेसला लवकरच राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. मात्र या पदावरील निवडीसाठी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर माथेफोड सुरू आहे.

नवी दिल्ली - गेल्या काही वर्षांपासून सोनिया गांधींकडे प्रभारी अध्यक्षपद सोपवून कारभार हाकत असलेल्या काँग्रेसला लवकरच राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. मात्र या पदावरील निवडीसाठी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर माथेफोड सुरू आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे या पदाची जबाबदारी स्वीकारण्यास फारसे उत्सुक नाही आहेत. मात्र पक्षातील अनेक नेते हे त्यांना अध्यक्ष बनवण्यासाठी अनुकूल आहेत. दरम्यान, राहुल गांधी यांना काँग्रेसचे अध्यक्ष बनवण्यासाठी पक्षामध्ये एकमत आहे, अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी दिली.

याआधी २०१७ मध्ये राहुल गांधी यांना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यात आले होते. मात्र २०१९ च्या निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर त्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी काँग्रेसचं अध्यक्षपद सोडलं होतं. तेव्हापासून सोनिया गांधी काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्ष म्हणून कामकाज पाहत आहेत. आता २० सप्टेंबरपर्यंत काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे.

अशोक गहलोत यांनी सांगितले की, देशभरामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करून राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. जर राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष बनले नाहीत तर ही बाब काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी निराशाजनक ठरेल. अनेक जण घरी बसतील, त्यामुळे पक्षाचं नुकसान होईल. राहुल गांधी यांनी प्रत्येक काँग्रेसी नेत्याच्या भावनांचा विचार करून अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे.

गहलोत यांनी सांगितले की, काँग्रेसने ७५ वर्षांपर्यंत देशात लोकशाहीला जिवंत ठेवले आहे. ही देशाला काँग्रेसने दिलेली भेट आहे. पुढील वर्षी राजस्थानमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पुन्हा एकदा विजयी होईल, असा विश्वास गहलोत यांनी व्यक्त केला.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसAshok Gahlotअशोक गहलोत