शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Rahul Gandhi: ‘बायको अशी हवी!’ राहुल गांधींनी सांगितल्या अपेक्षा, ही आहे पहिली अट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2023 13:43 IST

Bharat Jodo Yatra: आतापर्यंत अविवाहित असलेल्या राहुल गांधी यांच्या विवाहाबाबतही चर्चा सुरू असते. दरम्यान, एका मुलाखतीमध्ये राहुल गांधी यांनी आपल्या वैयक्तिक जीवनाबाबत मोकळेपणाने माहिती दिली. तसेच भावी जीवनसाथीबाबतचे आपले विचारही मांडले.

नवी दिल्ली - भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपल्या नेतृत्वाची जादू दाखवून दिली आहे. कन्याकुमारीपासून सुरू होऊन काश्मिरमध्ये पोहोचलेल्या या भारत जोडो यात्रेला देशभरातील जनतेकडून जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत अविवाहित असलेल्या राहुल गांधी यांच्या विवाहाबाबतही चर्चा सुरू असते. दरम्यान, एका मुलाखतीमध्ये राहुल गांधी यांनी आपल्या वैयक्तिक जीवनाबाबत मोकळेपणाने माहिती दिली. तसेच भावी जीवनसाथीबाबतचे आपले विचारही मांडले. ते म्हणाले की, जेव्हा कुणी योग्य मुलगी मिळेल, तेव्हा मी तिच्याशी लग्न करेन. मात्र त्यासाठी एक अट आहे ती म्हणजे ती मुलगी इंटेलिसेंज असली पाहिजे.  माझ्या आई-वडिलांचा विवाह खूप सुंदर झाल होता. त्यामुळे लग्नाबाबतचे माझे विचार खूप उत्तुंग आहेत. मला अशाच जीवनसाथीची अपेक्षा आहे.

राहुल गांधी यांनी सांगितले की, भारत जोडो यात्रेमध्ये मी देशेतील संस्कृती आणि खानपान खूप जवळून पाहिले आहे. तेलंगाणासारख्या राज्यात मसालेदार भोजनाचा उपयोग अधिक होतो. तसेच संस्कृती केवळ राज्यांच्या सीमांवर नाही तर राज्यांच्या अंतर्गतही बदलत असते.

तसेच ते पुढे म्हणाले की, अधिक राग आल्यावर मी गप्प बसतो. माझ्या पक्षातील लोक कधीकधी माझ्यावर दबाव आणत असतात. मात्र मी त्याला स्पष्टपणे नकार देतो.  भारत जोडो यात्रा ही एक तपस्या आहे. भारताच्या संस्कृतीमध्ये तपस्येला खूप महत्त्व आहे. त्यामुळे कुठल्याही कामामध्ये येणाऱ्या अडचणी ह्या एकप्रकारे तपस्या आहेत. देशामध्ये लाखो लोक तपस्या करत आहेत, असेही ते पुढे म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राmarriageलग्न