शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

खासदारकी गमावल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच वायनाड दौऱ्यावर, प्रियांका गांधीही सोबत असणार; असा आहे प्लॅन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 11:13 IST

Rahul Gandhi : वायनाड दौऱ्यात राहुल गांधी कलपेट्टा-कायनाट्टी येथील एका शाळेत 'जनसंपर्क' कार्यक्रमात सहभागी होतील आणि एका जाहीर सभेला संबोधित करतील.

नवी दिल्ली. संसदेचे सदस्यत्व गमावल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी  (Rahul Gandhi) आज पहिल्यांदाच त्यांच्या संसदीय मतदारसंघ वायनाड (केरळ) येथे जाणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वायनाड दौऱ्यात राहुल गांधी कलपेट्टा-कायनाट्टी येथील एका शाळेत 'जनसंपर्क' कार्यक्रमात सहभागी होतील आणि एका जाहीर सभेला संबोधित करतील. यावेळी त्यांची बहीण प्रियांका गांधीही (Priyanka Gandhi) त्यांच्यासोबत असणार आहेत. 

लोकसभेची खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी वायनाड मतदारसंघातील लोकांना भेटण्याची ही पहिलीच वेळ आहे. यावेळी राहुल गांधी कलपेट्टा येथे रोड शो देखील करणार आहेत. एसकेएमजे उच्च माध्यमिक विद्यालयापासून दुपारी 3 वाजता रोड शो सुरू होईल, असे स्थानिक वृत्तात म्हटले आहे. या रोड शोमध्ये लोकसभा मतदारसंघातील विविध भागातून हजारो लोक सहभागी होण्याची शक्यता आहे. 

याचबरोबर, एआयसीसीचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल, तारिक अन्वर, विरोधी पक्षनेते व्हीडी सतीसन, केपीसीसीचे अध्यक्ष के सुधाकरन, मुस्लिम लीगचे प्रदेशाध्यक्ष पनक्कड सय्यद सादिक अली शिहाब थंगल, पीके कुन्हालीकुट्टी, एनके प्रेमचंद्रन, सीपी जॉन आणि इतर अनेक नेते सहभागी होणार आहे. तसेच, यावेळी रोज शोमध्ये पक्षाच्या झेंड्याऐवजी राष्ट्रध्वजाचा वापर कार्यकर्ते करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

राहुल गांधी यांनी वायनाडमधूनच 2019 ची लोकसभा निवडणूक जिंकली होती. दुसरीकडे अमेठीच्या जुन्या जागेवरून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. राहुल गांधी यांनी वायनाडमध्ये 4.31 लाख मतांनी विजय मिळवला होता. दरम्यान, वायनाड संसदीय जागेचे प्रतिनिधित्व करणारे राहुल गांधी यांना सुरत येथील न्यायालयाने 2019 च्या मानहानीच्या खटल्यात दोषी ठरविल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाले आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीwayanad-pcवायनाडKeralaकेरळPriyanka Gandhiप्रियंका गांधी